आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचोळी एमआयडीसीत ७०० एकर वापराविना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चिंचोळी एमआयडीसीमधील (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) ४८७ प्लॉटच्या सुमारे ७०० एकर जागेवर व्यावसायिकांनी उद्योगच उभारला नाही. यामुळे ही जागा विनावापर पडूनच आहे. ही जागा २०१०, २०१२ मध्ये वाटप करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी मुकुंद बिबवे यांनी दिली आहे. खासदार विजयसिंह मोहिते यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह येथे अधिकारी आणि उद्योजक व्यावसायिकांची बैठक बोलावली हाेती. तेव्हा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

महापालिकेचेपितळ उघड
चिंचोळीएमआयडीसीला आठ ते दहा एमएलडी पाणी लागते, अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नेहमी सांगतात. परंतु शनिवारी झालेल्या बैठकीत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी चिंचोळी एमआयडीसीला चार एमएलडीच पाणी मिळत असून उद्योगवाढीसाठी एवढे पाणी खूपच कमी असल्याचे सांगितले. यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. सहा एमएलडी पाणी नेमके कुठे जाते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यावेळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील, उपमहापौर प्रवीण डोंगरे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी मुकूंद बिबवे, कार्यकारी अभियंता प्रमोद शेटके, उपअभियंता जी. ए. सय्यद, एरिया मॅनेजर व्ही.एन. बिरजे यांच्यासह चिंचोळी एमआयडीसी आणि अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील व्यावसायिक उपस्थित होते.

टेंभुर्णीला थ्री व्हिलर बनवणारी कंपनी लवकरच
सोलापूरजिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सांगलीमध्ये टू व्हीलरच्या कंपनीला आम्ही जागा देण्यास तयार होतो. परंतु त्यांनी पैसे भरल्यामुळे ते प्रकरण रखडले. टेंभुर्णीमध्ये थ्री व्हीलर बनवणारी कंपनी येत आहे. त्याला आम्ही जागा दिली. लवकरच ती उत्पादित कंपनी सुरू होईल, अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उद्योग येण्यात अडचणी असल्यास सांगा
किरकोळकारणामुळे काही उद्योग सोलापुरात येण्यापासून थांबले असतील तर आम्हाला सांगा. आम्ही त्यांना भेटून त्यांच्या अडचणी सोडवू, असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांनी केले. एमआयडीसीमधील मुख्य समस्यांबद्दल निवेदन तयार करा, मंत्र्यांबरोबर बैठक लावू, अशी हमी खासदार विजयसिंह मोहिते यांनी दिली.

मनपा आयुक्तांची नवी कल्पना... काजू, आंबा प्रक्रिया उद्योग येणे शक्य
कोकणातकाजू आणि आंब्याचे उत्पादन जास्त आहे. त्यावरील प्रक्रिया ही बंगळुरू येथे केली जाते. कोकण ते बंगळुरू सुमारे १९ तासांचा प्रवास आहे. मात्र कोकणापासून सोलापूर अवघ्या सात ते आठ तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे काजू आणि आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सोलापुरात आणले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. असे दहाजण सोलापुरात येण्यास तयार आहेत. एमआयडीसीवाल्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. आम्हीही प्रयत्न करू, असे मत महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी व्यक्त केले.