आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 75 Thousands Of Gold Jewelery Theft Issue At Solapur

पॉलिशच्या बहाण्याने 75 हजारांचे दागिने पळवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भांड्यावरील आणि दागिन्यांवरील डाग काढतो, अशी बतावणी एका घरातून 75 हजार रुपयांचे दागिने पळवल्याची घटना सोमवारी घडली. फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे.
नलिनी चन्नप्पा सावळगी (वय 50, रा.र्शीराम हाईस्ट, कसबा रोड) यांच्याकडे सोमवारी दुपारी दोन वाजता आम्ही उज्ज्वला कंपनीकडून आलो आहोत, असे म्हणत दोन अज्ञात व्यक्ती सावळगी यांच्याकडे आल्या. दागिने व भांड्यावरील डाग काढतो, असे त्यांनी सांगितले. यावर सावळगी यांनी सोन्याचे 75 हजार रुपये किमतीच्या चार बांगड्या स्वच्छतेसाठी दिल्या. स्वयंपाक घरात ठेवलेले गरम पाणी घेऊन येईपर्यंत, चोरांनी दागिने घेऊन पोबारा केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

दुकान फोडून 44 हजारांचे 19 हॅण्डसेट चोरीला
माढय़ातील वाकाव येथे एक मोबाइल दुकान फोडून 44 हजार रुपये किमतीचे हॅण्डसेट चोरीस गेले. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिसांत झाली आहे. फिर्यादी रणजित लक्ष्मण भुसारे (वय 21, रा. वाकाव, ता. माढा) यांचे माढा ग्रामपंचायतीसमोर वैभव मोबाइल नावाचे दुकान आहे. 28 ते 29 डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून 19 हॅण्डसेट चोरून नेले. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक मुलाणी करीत आहेत.

अतडिपार शिक्षा झालेल्या आरोपीस शहरात अटक
राहुल गांधी झोपडपट्टीमधील तडिपार आरोपीस शहरात वावरताना अटक केली. दोन वर्षांसाठी तडिपार केलेल्या आरोपीने नियमभंग केल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी नितीन विठ्ठल कट्टीमनी (वय 23, रा. राहुल गांधी झोपडपट्टी) यास 7 सप्टेंबर 2012 पासून सोलापुरातून दोन वर्षांसाठी तडिपार केले होते. मुदतीपूर्वीच त्याने शहरात प्रवेश केला. प्रवेश करताना पोलिस आयुक्तांची परवानगी घेतली नाही. नियमभंग केल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी अटक केली. पुढील तपास फौजदार लंकेश्वर करीत आहेत.