सोलापूर - शिर्डीहून पंढरपूरला निघालेली आंध्र प्रदेशमधील खासगी बस पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ८ प्रवासी जागीच ठार, तर १३ प्रवासी जखमी झाले. यातील ८ प्रवासी गंभीर जखमी असून दोघांची प्रकृती अधिकच चिंताजनक आहे. करमाळा -टेंभुर्णी मार्गावरील टेंभुर्णीपासून १३ किमी अंतरावरावरील कविट गावाजवळ मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. ए.पी. २१ एक्स ०४०८ क्रमाकांच्या खासगी बसमध्ये एकूण ४९ प्रवासी होते. अपघातात मृत आंध्रमधील कृष्णा जिल्ह्यातील, तर जखमी विजयवाडामधील चिलकलापुडी या गावचे रहिवासी होते. अपघातातील मृत व जखमींना विमानाने हैदराबादला पाठवण्यात आले.