आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआयचे 80 टक्के विद्यार्थी झाले नापास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- यंदाआयटीआयच्या परीक्षेत बदललेल्या पद्धतीबाबतची पुरेशी माहिती राज्यातील शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना वेळेत दिली गेली नाही त्यामुळे ८० टक्के विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण व्हावे लागले.

नकारात्मक गुण पद्धती लागू केल्याने असे घडले. या पार्श्वभूमीवर नव्याने लागू करण्यात आलेल्या नकारात्मक गुण पद्धतीच्या अवलंबाबाबत प्रश्नपत्रिकेवर अथवा उत्तरपत्रिकेवर उल्लेख नसताना अशी पद्धती लागू करणे अन्यायकारक असल्याचे निवेदन स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने दिले आहे.
दरवर्षी आयटीआयचा निकाल ७० टक्के ८० टक्के लागत होता. परीक्षा मंडळ आणि प्रशिक्षण संस्थांच्या समन्वय अभावाने हा गलथान प्रकार समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यात तर गव्हर्न्मेंट आयटीआयचा निकाल २६ टक्के, मुलींच्या आयटीआयचा ५० टक्के इतकाच लागू शकला. खासगी आयटीआयमधील अनेक ट्रेंडचा निकाल तर शून्य टक्केच लागला गेला.
मुलींच्याआयटीआयची आघाडी, निकाल लागला ५० टक्के
डफरीनचौकातील मुलींच्या आयटीआयचा निकाल ५० टक्के लागला. १५० पैकी ७५ विद्यार्थिनी उत्तीर्ण. याचे कारण सांगताना प्राचार्य एम. एस. अावटे म्हणाले, आम्ही बदललेल्या पॅटर्नसंदर्भात वारंवार सूचना दिल्या. लेखी परीक्षांचा सराव घेतला. निगेटिव्ह मार्किंगबाबतही सूचना दिल्या. प्रश्नपत्रिका हिंदी किंवा इंग्रजीमध्येच असते. त्यामुळे आठवी बेस असणाऱ्या काहींना ती प्रश्नपत्रिका अवघड वाटू शकते. निगेटिव्ह मार्किंगसह निकाल कमी लागण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.
नव्या पध्दतीमुळे परिणाम
विद्यार्थ्यांनाबदललेल्या पॅटर्नची सूचना दिल्या. प्रश्नपत्रिका इंग्रजीतून असल्याने तसेच निगेिटव्ह मार्किंग असल्याने कमी निकाल लागला. व्ही.जे. कांबळे, प्राचार्य,गव्हर्न्मेंट आयटीआय मुलांचे
लेखीपरीक्षेत अनुतीर्ण जास्त निगेटिव्हपद्धतीमुळे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. लेखी परीक्षा बहुपर्यायी स्वरूपात होती. ड्रॉईंगच्या परीक्षेत उत्तीर्ण इतर परीक्षेत अनुत्तीर्ण असेही घडले. बी.सी.पाटील, प्राचार्य,मराठवाडा आयटीआय, तळेहिप्परगा औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांबाबत एसएफआयशी संपर्क साधावा, असे आवाहन किशोर झेंडेकर (७६२००९४४७०), नम्रता निली (९१५६०७९४१२) यांनी केले.