आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धरामेश्वरांच्या भेटीस 81 पालख्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘सिद्धरामेश्वर महाराज की जय,’चा जयघोष आणि ‘ओम नम; शिवाय’चा जप करीत तिसर्‍या श्रावण सोमवारनिमित्त अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी मंदिर ते श्री सिद्धरामेश्वर मंदिर असा पालखी सोहळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र व कर्नाटक या सीमावर्ती भागातील 81 पालख्या या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
वीरतपस्वी मंदिरात होटगी मठाचे नूतन मठाधीश मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या प्रमुख हस्ते पूजन झाले. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजता माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. ब्रहन्मठ होटगी संस्था व शिवयोगी सिद्धेश्वर मंदिर, हब्बू पुजारी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने र्शावणाच्या तिसर्‍या सोमवारी या पालख्यांची मिरवणूक निघते. गेल्या पाच वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या मिरवणुकीत महापौर अलका राठोड, होटगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाराव कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शांतय्या स्वामी, मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी सहभागी झाले होते.
सोमवारी सकाळी सुरू झालेली ही मिरवणूक दुपारी एकच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरात आली. वीरतपस्वी मंदिर, पाण्याची टाकी, कन्ना चौक, सोन्नलगी मंदिर, कोंतम चौक, मधला मारुती, टिळक चौक, मल्लिकार्जून मंदिर, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा मार्गे सिद्धेश्वर मंदिर या मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी रविवारी रात्रीपर्यंत वीरतपस्वी मंदिरात विविध भागातून या पालख्या दाखल झाल्या होत्या. पुजारी आनंद हब्बू, सुभाष हब्बू, सुभाष धुमशेट्टी, रेणुक हब्बू, प्रशांत हब्बू यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत झाले. मिरवणुकीच्या सांगतेनंतर महाप्रसाद वाटप व धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम झाला. भाविकांनी मोठय़ा र्शद्धेने सहभागी पालख्यांचे दर्शन घेतले.