आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा होणार 68 लाख टन साखरेचे उत्पादन होणार - विजयसिंह मोहिते-पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - ऑक्टोबरपासून होत असलेल्या सन 2013-14 च्या गळीत हंगामात राज्यात सुमारे 5 कोटी 90 लाख टन उसाचे गाळप होऊन 68 लाख टन साखरचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. राज्य शासन व साखर संघ यांच्या संयुक्त अहवालातून ही माहिती उपलब्ध झाली आहे, असे साखर संघाचे अध्यक्ष आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 11 लाख 87 हजार टनाने साखर उत्पादनात घट होणार आहे.


यंदा होणार 68 लाख टन साखरेचे उत्पादन
सन 2013 -14 च्या गळीत हंगामात राज्यातील साखर उद्योगांसमोर ऊसटंचाईची मोठी समस्या उभी राहिली आहे. गत वर्षी राज्यात एकूण 170 साखर कारखान्यांनी 7 कोटी 26 लाख टन उसाचे गाळप करून 79 लाख 87 हजार टन साखर उत्पादित केली होती. यावर्षी राज्याचा सरासरी साखर उतारा 11.041 टक्केएवढा राहिला होता. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू होत असलेल्या गाळप हंगामात 5 कोटी 90 लाख टन ऊस गळितासाठी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. यातून सरासरी 11.50 टक्केएवढय़ा साखर उतार्‍याने सुमारे 68 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असे आमदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. यंदा उसाच्या कमतरतेमुळे 30 ते 40 साखर कारखान्यांना आपले गाळप बंद ठेवावे लागेल, अशी परिस्थिती आहे. जे कारखाने गळीत सुरू करतील त्याचा गाळप हंगाम तीन ते चार महिनेएवढाच चालेल, असे मोहिते-पाटील यांनी सांगितले. सन 2014- 15 चा हंगामात मात्र अतिरिक्त उसाची समस्या पुन्हा भेडसावण्याची शक्यता आहे.


सन 2013-14 च्या हंगामातील अंदाजित आकडेवारी लाख टनात
तपशील देशात महाराष्ट्रात
हंगामपूर्वीचा शिल्लक साठा 89.38 22.54
2013-14 चे साखर उत्पादन 230 68
एकूण उपलब्धता 319.38 90.54
देशांर्तगत खप 230 77
निर्यात पांढरी कच्ची 10 5
एकूण खप 240 82
हंगाम अखेर शिल्लक साठा 79.38 8.54