आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८९ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या योजना बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पाणीपुरवठा योजना असलेल्या गावांना टँकर देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे तर दुसरीकडे तब्बल ८९ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजना दुरुस्तीअभावी थकीत वीज बिल भरल्याने आज बंद अवस्थेत आहेत. पाणीटंचाई दूर व्हावी, या उद्देशाने कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या असताना दुसरीकडे गावपातळीवरील राजकारणामुळे आज पाणी पुरवठाच्या योजना बंद आहेत.

५० टक्के बिल भरावे लागणार...
महाराष्ट्रजीवन प्राधिकरणच्या योजना बंद आहेत, यामध्ये योजना या थकित वीज बिलामुळे बंद आहेत. २८ गावांची जेऊर पाणीपुरवठा योजनेची थकबाकी कोटी ५१ लाख आहे, यापैकी १० लाख भरून योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. इतर योजनांचीही थकबाकी ५० लाखांपर्यंत आहे. किमान ५० टक्के थकीत बिल भरल्याशिवाय योजना कार्यन्वित होणे अशक्य आहे. थकीत बिले भरण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीही नाही.

थकीत वीज बिलामुळे गावचा पाणीपुरवठा बंद असेल तर विकास कामाच्या निधीतून वीज बिल भरणा केला जाईल. यामुळे बंद योजना कार्यान्वित होण्यास मदत होईल. याशिवाय शासनाकडून इतर विकास कामासाठी मिळणारे अनुदान या ठिकाणी वापरता येईल.'' तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १५ योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतर केल्या आहेत. यामध्ये योजना आजही बंद आहेत. यामध्ये जिल्हा परिषद ५० टक्के वीज बिल भरून सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. योजना कार्यन्वित झाल्यापासून ते आजपर्यंत ज्या गावांसाठी योजना आहेत, त्यांच्याकडून वीज बिल भरलेच नाही. कोर्टी योजनेचे थकीत बिल भरण्यात येणार आहे. यामुळे ही योजना कार्यन्वित होण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधी चिडीचूप ?
थकितवीज बील नादुरूस्तीमुळे बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. आमदार गणपतराव देशमुख यांच्या सांगोला तालुक्यातील शिरभावी योजना वगळता इतर एकही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. इतर योजना सुरू करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधी समोर आले नाहीत. सर्वांनाच थकित वीज बील भरण्यासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.