आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात ‘नो डिजिटल’ चौकात 89 फलक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील 9 चौकांना नो डिजिटल झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पण या चौकात डिजिटल फलक लावण्याची स्पर्धा दिसून येते. दै. ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी केलेल्या पाहणीत 9 नो डिजिटल चौकांत 89 विनापरवाना फलक उभारण्यात आल्याचे दिसून आले. तसेच, 300 स्क्वेअर फुटांपेक्षाही मोठे असलेल्या फलकांची संख्या अधिक होती. महापालिका एक ऑक्टोबरपासून या चौकातील फलक काढण्याची मोहीम हाती घेणार आहे. दरम्यान, फलक काढण्याच्या कारवाईला विरोध करीत 13 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्याची मागणी चार संघटनांनी केलेली आहे.

या संस्थांचे आहेत फलक

जीएम, पीबी, पीआर, एके, डीजे, आरजे, डीके, सीएम, आरके, आरडी ग्रुप, शिवगंगा व शिवनेरी प्रतिष्ठान, सळई मारुती युवक मंडळ, भारिप बहुजन महासंघ, ज्ञानगंगा नवरात्र महोत्सव मंडळ, बिज्जू प्रधाने वाढदिवस शुभेच्छा, शिवाई प्रतिष्ठान, महेश कोठे सामाजिक प्रतिष्ठान, भीमप्रेम प्रतिष्ठान, जय अंबिका तरुण मंडळ, जय माता दी, रॉकी, वाग्यज्ञ आदी.

आज व्यावसायिकांची आयुक्त घेणार बैठक

शहरात डिजिटल फलक तयार करणार्‍या व्यावसायिकांची बैठक महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बोलवली आहे. या वेळी फलकांबाबत चर्चा केली जाणार आहे.