आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट सोने तारण ठेवून इंडियन बँकेला कोटी ९० लाखांचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - इंडियनबँकेच्या दोन शाखांना बनावट सोने खरे असल्याचे पत्र देऊन कोटी ९० लाखांचे सोने तारण कर्ज मंजूर करायला लावणा-या बँकेच्या व्हॅल्यूएटर (मूल्यांकन अधिकारी)ला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यासह २० कर्जदारांवर विजापूर नाका आणि सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. २१ डिसेंबर २०१० ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. बँकेच्या वार्षिक तपासणीवेळी दुस-या व्हॅल्यूएटर केेलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँक अधिका-यांनी पोलिसांत धाव घेतली.

विजयकुमार मधुकर कुुलकर्णी (वय ४५, रा. मायादेवी संकुल, जुळे सोलापूर, बँक ऑफ इंडिया कॉलनीजवळ) असे अटक केलेल्या व्हॅल्यूएटरचे नाव आहे. बँकेचे व्यवस्थापक विद्याभूषण त्रिलोचन सेनापती (रा. राजपूत बिल्डिंग, व्हीआयपी रोड, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.

जुनाएम्प्लॉयमेंट चौक शाखेतील फसवणूक; सदर बझार पोलिसात १८ जणांवर गुन्हा
अब्दुलमलीक शेख (रुबी नगर), अजय सिंग (दक्षिण सदर बझार), प्रियदर्शन साठे (तीर्थरूप अपार्टमेंट, रेल्वे लाइन), तेजस नानाजी मोरे (महालक्ष्मी कम्युनिकेशन दक्षिण सदर बझार), विशाल शंकर कल्याणी (आनंद विणकर सोसायटी, गांधीनगर), अझरुद्दीन हनीफ नदाफ (रा. टिळक चौक, आयसीआयसीआय एटीएमजवळ), अशपाक काशीम इनामदार (रा. भवानीपेठ, मड्डीवस्ती)

असा घडला प्रकार
विजयकुमारचेआसरा चौकात सराफ दुकान आहे. इंडियन बँकेने त्याची २००९ पासून व्हॅल्यूएटर (गहाण ठेवलेले दागिन्याची मूल्य ठरवून देणे) म्हणून नियुक्ती केली होती. या कालावधीत जुना एम्प्लॉयमेंट चौक शाखेत ३६ जणांनी गोल्ड लोन घेतले. त्यापैकी १८ जणांसोबत संगनमत करून त्याने बँकेला बनावट सोने खरे असल्याचे मूल्यांकन प्रमाणपत्र दिले. बँकेने दागिने गहाण ठेवून कर्ज दिले. कर्ज मिळाल्यानंतर कुलकर्णी याने संबंधित कर्जदाराकडून निम्मे पैसे घेतले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत विविध १८ सोने तारण कर्ज प्रकरणात हाच प्रकार घडला. जानेवारी महिन्यात बँकेच्या वार्षिक तपासणीवेळी दुस-या दुकानदाराने दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन केले. त्यात दागिने बनावट असल्याचे आढळले. या दागिन्यांचे मूल्यांकन कुलकर्णी यांनीच केले होते. अठराजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दुकानदार विजयकुमारसह दोघांना अटक झाली आहे.