आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

91 केबल ऑपरेटर्सनी भरला 66 लाखांचा करमणूक कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- करमणूक कर कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शहरातील 91 केबल ऑपरेटर्सनी मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांत 66 लाख सात हजार 278 रुपयांचा करमणूक कर जमा केला. आणखी 57 ऑपरेटर्सनी अद्याप करमणूक कर जमा केला नसल्याची माहिती नायब तहसीलदार व्ही.आर. पोतदार यांनी दिली.
खरी माहिती द्या अन्यथा कारवाईला समोरे जा, अशी भूमिका करमणूक कर कार्यालयाने घेतली. 11 केबल ऑपरेटर्सवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे शहरातील सर्व केबल ऑपरेटर सोमवारपासून करमणूक कर भरण्यासाठी आले होते. एप्रिल 2013 ते आजपर्यंत एकाही केबल ऑपरेटरने करमणूक कर भरला नव्हता. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल झाल्यानंतर मात्र सर्वांनी रीतसर चलनाद्वारे रक्कम भरण्याची तयारी दाखवली. बुधवारी सायंकाळपर्यंत 91 केबल ऑपरेटर्सनी 66 लाख रुपये कर जमा केला आहे.