आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धरामेश्वरांच्या भेटीला आल्या 95 पालख्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘एकदा भक्तलिंग हर्र बोला, हर्र’, ‘श्रीसिद्धेश्वर महाराज की जय’ च्या जयघोषात शहर जिल्ह्यासह परराज्यांतून आलेल्या 95 पालख्यांनी सोलापूर शहर भक्तिमय झाले. गेल्या नऊ वर्षांपासून तिसर्‍या श्रावण सोमवारनिमित्त ग्रामदैवत श्रीसिद्धरामेश्वर यांच्या भेटीला या पालख्या येत आहेत. सोमवारी दुपारी सवाद्य मिरवणुकीने या पालख्यांचे आगमन झाले.


अक्कलकोट रस्त्यावरील होटगी मठाच्या मंदिरापासून सकाळी साडेसहा वाजता पालखी पूजन झाल्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. या वेळी होटगी मठाचे श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामी, माजी मंत्री बसवराज पाटील (मुरुम), माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, नगरसेवक महेश कोठे यांच्यासह श्री श्रीकंठ शिवाचार्य, श्री रेणूक शिवाचार्य, श्री शिवानंद शिवाचार्य, श्री पंचाक्षरी शिवाचार्य यांची उपस्थिती होती.

लक्षवेधी पालखी सोहळा
अग्रभागी बैलजोडी, हलग्या आणि बँडपथक परिसरात पालख्यांचे आगमन होत असल्याची वर्दी देत होते. काही पालखीधारक सेवेकरी काळी घोंगडी खांद्यावर घालून नृत्य करीत पालख्या उचलत होते, तर सगळयात पुढे शेकडो सुहासिनी कलश घेऊन मार्गक्रमण करीत होत्या.

या गावातील पालख्यांचा सहभाग
कुंभारी, होटगी, शिंगडगाव, कोन्हाळी, दोड्याळ, वडगाव, रामपूर, नंदगाव, जळकोट, तोगराळी, भोसगा, हालहळ्ळी, दर्गनहळ्ळी, शिरपनहळ्ळी, तीर्थ, कर्जाळ, लिंबीचिंचोळी, वळसंग, बोरगाव, चपळगाव, मुळेगाव, दर्शनाळ, दोड्डी, जेवळी, मुस्ती, बोरामणी, धोत्री, दाळी, मंद्रूप, होनमुर्गी, बरुर, नांदणी, निंबर्गी, हत्तूर, औराद, बसलेगाव, अणदूर, सराटी, फुलवाडी, शिंदगाव, आष्टा, हंगरगा, अचलेर, मुरुम, बेळंब, सलगर, तुगाव, तुपगाव, चिवरी, खुदावाडी, केसेगाव, नीलेगाव, शापुर, वडगाववाडी, होरटी, गोगाव, वागदरी, घोळसगाव, उळे, कासेगाव, आहेरवाडी, बंकलगी, अळगी आदी.

भक्तीला आले उधाण, दर्शनासाठी गर्दी
>सिद्धरामेश्वरांचे जवळपास चार लाख भाविकांनी घेतले दर्शन
>20 हजार सेवेकरी व भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
>2005 पासून पालखी सोहळ्याचे केले जाते आयोजन
>सहा तास चालला पालखी सोहळा
>योग समाधीस फुलांची सजावट