आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीचा धाक दाखवून दीड लाख लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - बेलापूर येथील पेट्रोलपंपाचा भरणा श्रीरामपूर येथील स्टेट बँकेत घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्यास बंदुकीचा धाक दाखवून दीड लाखांची रोकड लांबवल्याची घटना श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावर बुधवारी घडली. या प्रकरणी रस्तालुटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
बेलापूर येथे पढेगाव रस्त्यावर विजय भागवत नाईक यांचा बी. के. पेट्रोल पंप आहे. मंगळवारी झालेल्या पेट्रोलविक्रीची रक्कम नाईक यांनी आपल्या स्कुटीच्या (एमएच १७ बीएम ६७८७) डिकीत ठेवली होती. ही रक्कम श्रीरामपूर येथील स्टेट बँकेत भरण्यासाठी ते सव्वातीनला पंपावरून निघाले. त्यांच्या समवेत पेट्रोलपंपावरील एक कर्मचारीही होता. हा कर्मचारी गाडी चालवत होता, तर नाईक पाठीमागे बसले होते. त्यांची गाडी मोसंबीच्या बागेजवळ आली असता पाठीमागून काळया पल्सरवरून आलेल तिघांनी गाडी आडवी लावून नाईक यांची गाडी थांबवली. त्यांच्यापैकी एकाने नाईक यांच्या डोक्याला बंदूक लावून स्कुटीच्या डिकीतील रक्कम काढण्यास सांगितले. जीवाच्या भीतीने नाईक यांनी डिकी उघडून पिशवीत ठेवलेली रक्कम चोरट्यांच्या हवाली केली. रक्कम हाती येताच चोरट्यांनी पुन्हा बेलापूरच्या दिशेने धूम ठोकली.