आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईंच्या चरणी वर्षभरात १ कोटीचे २२३ हिरे अर्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - शिर्डीच्या साईबाबांना गेल्या वर्षभरात भाविकांनी एक कोटी सहा लाखांचे २२३ हिरे, जडजवाहिरे, रत्ने अर्पण केले. यात एका ९२ लाख रुपयांच्या सुवर्ण हिरेजडीत हाराचा समावेश असून त्याला दोन हिरे जडवलेले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी दिली. १ एप्रिल २०१५ ते २३ मार्च २०१६ या कालावधीत संस्थानला देणगी स्वरूपात २२३ हिरे,मोती,जडजवाहर हिरे मिळाले. या सर्व मौल्यवान खड्यांचे नुकतेच अधिकृत व्हॅल्युअरच्या माध्यमातून म्ूल्यांकन करण्यात आले.त्यानुसार या खड्यांची किंमत एक कोटी सहा लाख रुपये असल्याचे झिरपे यांनी सांगितले.

यात एक सुवर्णहारही अाला आहे. त्याच्या पॅडल मध्ये दोन हिऱ्यांचा समावेश आहे.यातील एका हिऱ्याची किमत ६ लाख ८७ हजार रुपये तर दुसऱ्याची ८५ लाख ४ हजार रुपये आहे. साई संस्थानकडे जवळपास सव्वा नऊ कोटी रुपयांचे हिरे,जडजवाहिरे,३९२ किलो सोने,४१७८ किलो चांदी आहे.तर विविध राष्ट्रीयकृत बँकामध्ये १५८७ कोटींच्या ठेवी आहेत़