आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरेच्या कोठडीत १० जूनपर्यंत वाढ, अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची दिली होती धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्येष्ठसमाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ज्ञानेश मोहिनीराज पानसरे (वय ४३, नेवासे) याच्या पोलिस कोठडीत वाढ झाली. ज्ञानेशला जूनला रात्री पोलिसांनी नेवाशातून ताब्यात घेत अटक केली. हजारे यांना सहावेळा जीवे मारण्याची धमकी देणारी पत्रे त्याने लिहिली होती.
त्याच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. जूनला दुपारी त्याला न्यायालयात हजर करून पोलिस काेठडी देण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयाने त्याला जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्याच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा अधिक तपासाकरिता त्याची कोठडीची मुदत वाढवून देण्याची विनंती तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात केली. त्यानुसार ज्ञानेशचा पोलिस कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला आहे.
बातम्या आणखी आहेत...