आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Thousand 212 Qusecs Water Relased In Pravara River Bed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 हजार 212 क्युसेक्स पाणी प्रवरा नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - पश्चिम घाटातील आदिवासी गावांना पावसाने झोडपून काढले. बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासांत रतनवाडी येथे 10 इंच (252 मिमी), तर घाटघरला 9 इंच (244 मिमी) पाऊस झाला. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटले, भाताची रोपे वाहून गेली. निळवंड्यातून मंगळवारी 6 हजार 254 क्युसेक्स विसर्ग सुरू होता. त्यामध्ये बुधवारी वाढ होऊन 10 हजार 212 क्युसेक्स पाणी प्रवरा नदीपात्रातून जायकवाडीत जात आहे.

भंडारदरा धरणात पाणीसाठा वाढत चालल्याने त्यातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. पाणीसाठा 10 हजार 599 दशलक्ष घनफुटांवर नियंत्रित ठेवण्यासाठी 10 हजार 78 क्युसेक्स पाणी निळवंड्यात सोडण्यात येत आहे. वीजनिर्मितीसाठी टनेलमधून सोडलेल्या 820 व अम्ब्रेला फॉलच्या व्हॉल्व्हमधून सोडलेल्या 186 क्युसेक्ससह स्पीलवेमधून सोडलेल्या 9 हजार 72 क्युसेक्स विसर्गामुळे निळवंड्याच्या सांडव्यावरून 10 हजार 212 क्युसेक्स पाणी जायकवाडीच्या नाथसागराकडे जात आहे. निळवंड्यातील साठा 5,212 दशलक्ष घनफूट आहे.

आढळा मध्यम प्रकल्पात 590 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणात मंगळवारी सकाळी 20 टीएमसी पाणीसाठा होता. पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे - भंडारदरा 64, निळवंडे 27, आढळा 20, वाकी 73, कोतूळ 23, रतनवाडी 252, घाटघर 244, पांजरे 106, अकोले 24.