आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पात्रता परीक्षेचे 10 हजार अर्ज दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिक्षक पात्रता परीक्षेसाठीचे ऑनलाइन पद्धतीने भरलेले आवेदन पत्र जिल्हा परिषदेकडे दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. पण जिल्हा परिषदेने अर्ज स्वीकृतीसाठी नियोजन केल्याने गर्दीनंतरही अध्र्या तासात आवेदनपत्र दाखल करणे विद्यार्थ्यांना शक्य होत आहे. शुक्रवार दहाव्या दिवसाअखेर तब्बल 10 हजार 516 आवेदन पत्र परीक्षा कक्षाकडे जमा झाली आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षा 15 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी डीटीएड, बीएड् पात्रताधारकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जात आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्या आवेदन पत्राची प्रत जिल्हा परिषदेतील परीक्षा कक्षाकडे जमा करावयाची आहे. त्यासोबत गुणपत्रकांच्या मूळ प्रतींची पडताळणी करून घ्यावयाची आहे. नगर जिल्हा परिषदेतील परीक्षा कक्षाकडे आवेदनपत्र दाखल करण्यासाठी आणि गुणपत्रकांची पडताळणी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. मुलांसाठी 7 टेबल, तर मुलींसाठी 8 टेबलांवर अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रचंड गर्दीनंतरही अध्र्या तासात अर्ज स्वीकारला जात आहे. अर्ज स्वीकृतीनंतर विद्यार्थ्यांना पोहोच दिली जात आहे. कक्ष प्रमुख शिक्षणाधिकारी (प्राथमिक)सुलोचना पठारे, उपकक्ष प्रमुख उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली व विस्तार अधिकारी रमजान पठाण यांच्या नियोजनानुसार विस्तार अधिकारी शिवाजी कर्‍हाड, सुरेश ढवळे, कांतीलाल ढवळे, अक्षयकुमार वाव्हळ, निर्मला साठे, मंदाकिनी गायकवाड अनेक अधिकारी जातीने कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी 11 नोव्हेंबरपर्यंत मुदत असून शासकीय सुट्या वगळून 15 नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्र परीक्षा कक्षाकडे दाखल करून घेतले जाणार आहेत.