आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍याला 10 वर्षे सक्तमजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी एकाला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. नवनाथ भाऊसाहेब गायके (20, पोखर्डी, ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी हा निकाल दिला.

ही घटना 2009 मध्ये घडली होती वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार एमआयडीसी ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणले. तिच्यासोबत गायके व शेजारी राहणारी एक महिला होती. गायके व त्या महिलेने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे, तसेच गायकेने बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी गायकेविरुद्ध मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा व बलात्काराचा गुन्हा नोंदवला. नंतर तपास करून दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अँड. सुरेश लगड यांनी काम पाहिले.

सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. पोलिस उपअधीक्षक संदीप डोईफोडे, अत्याचारित मुलीचे वडील, मुलगी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. गायकेसमवेत असलेल्या अन्य एका महिलेविरुद्ध पुरावा नसल्याने तिला न्यायालयाने यापूर्वीच निदरेष सोडले होते. नवनाथ गायकेविरूद्धचे साक्षीपुरावे ग्राह्य धरून त्याला दोषी ठरवण्यात आले.