आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीत शिकणाऱ्या आदित्य देवचक्के याने अमेरिका भेटीवर लिहिले पुस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अमेरिकेतील नासा या वैज्ञानिक केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील अनुभवांवर आधारित ‘अमेरिकेतील नासायन’ या आदित्य अनिरूध्द देवचक्के याने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या सोमवारी (१६ जानेवारी) सायंकाळी ४.३० वाजता माउली सभागृहात केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य चंद्रकांत पालवे आणि जयंत येलूलकर यांनी बुधवारी दिली. 

या कार्यक्रमात झेलम चौबळ यांचे अमेरिकेतील नासा सेंटर आणि माझा जगप्रवास या विषयावर व्याख्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अहमदनगर टुरिझम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, श्रीरेणुकामाता मल्टिस्टेटचे अध्यक्ष प्रशांत भालेराव आणि हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव सुनील रामदासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अाहेत. 

या पुस्तकाला झेलम चौबळ यांची प्रस्तावना डॉ. कळमकर यांचा अभिप्राय लाभला असून येथील विहंग प्रकाशनातर्फे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे किशोर मरकड यांनी सांगितले.