आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळाचा साठा १२ टीएमसीवर: पाणलोट क्षेत्रात पावसाला पुन्हा प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मध्यंतरीच्या खंडानंतर मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यामुळे मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईल. सध्या धरणातील पाणीसाठा १२ टीएमसीवर पोहोचला असून उपयुक्त साठा ३५ टक्क्यांहून अधिक झाला आहे.
यंदा मोसमी पाऊस वेळेवर सुरू झाला. मात्र, सुरुवातीच्या दोन-तीन दमदार पावसानंतर गेल्या दीड महिन्यापासून अकोले वगळता जिल्ह्यातील इतर तालुके कोरडेठाक आहेत. अकोले तालुक्यात पावसाने गेल्या आठवड्यात सरासरी ओलांडली. या तालुक्यात वर्षभरात सरासरी ४९४ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच अकोले तालुक्यात ५२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी मुळा, भंडारदरा निळवंडे या प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुळा धरणात पंधरा दिवस अगोदर नवीन पाण्याची आवक सुरू झाली. गेल्या वर्षी मुळा धरणात १२ जुलैदरम्यान नवीन पाण्याची आवक सुरू झाली होती. मात्र, यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यातच नवीन पाण्याची आवक सुरू झाली. पावसात खंड पडल्याने सुरुवातीला अवघे एक टीएमसी नवीन पाणी आले. उपयुक्त पाणीसाठा दोन टक्क्यांच्या आसपास आल्यानंतर ही आवक सुरू झाल्याने नळ पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला होता. गेल्या वर्षी पाणलोट क्षेत्रात उशिरा, पण दमदार पाऊस झाला होता. परिणामी गेल्या वर्षी याच कालावधीत धरणातील साठा ५२ टक्क्यांच्या (१३ हजार ५३१ दशलक्ष घनफूट) पुढे सरकला होता. यंदा पंधरा दिवस अगोदर आवक सुरू होऊनही अद्याप धरण पन्नास टक्केही भरलेले नाही. सध्या धरणात १२ हजार दशलक्ष घनफूट (४६.१ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

भंडारदरा धरणात सध्या ७९०५ दशलक्ष घनफूट (७२ टक्के) साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणात जवळपास एवढाच साठा होता. निळवंडे धरणात मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी जमा झाले आहे. निळवंडे धरणात सध्या ४३०० दशलक्ष घनफूट साठा आहे.
आतापर्यंत सरासरीच्या २८ टक्के पाऊस
जिल्ह्यातजून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरी ४९७.४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत १३८.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अकोले तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून नगर राहाता तालुक्यात अनुक्रमे ३१ ३३ टक्के पाऊस झाला. उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये २७ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला अाहे. गेल्या वर्षी या कालावधीत २४ टक्के पाऊस झाला होता.
बातम्या आणखी आहेत...