आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 12 वर्षे सक्तमजुरी, नगरमधील नांदगाव येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला दोषी ठरवून न्यायालयाने १२ वर्षे सक्तमजुरी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मल्हारी सखाराम उमाप (वय २५, नांदगाव, ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी दुपारी हा निकाल दिला. नगर तालुक्यातील नांदगावात ही घटना घडली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी काम पाहिले. 
 
पीडित मुलगी धुणीभांड्याचे काम करते. उमाप याने शेजारी राहणाऱ्या लहान मुलाला पाठवून तिला भांडी घासायच्या बहाण्याने बोलावून घेतले. मुलगी घरी आली असता त्याने बलात्कार केला. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर आई तिला पाेलिस ठाण्यात घेऊन गेली. पोलिसांनी उमाप मुलाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, तसेच बलात्काराच्या कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवला. 
 
एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. मुलगी, आई, वैद्यकीय अधिकारी तपासी अंमलदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. डीएनए रिपोर्टही सकारात्मक आला होता. या सर्व बाबींच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. 
 
जलदगतीने निकाल 
कोपर्डीप्रकरण घडल्यानंतर पुढच्याच आठवड्यात नांदगाव येथे हा प्रकार घडला होता. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार स्वाती देवडकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. विशेष म्हणजे कोपर्डी खटल्याचे कामकाज ज्यांच्यासमोर सुरू आहे, त्याच न्यायालयात या खटल्याची सुनावणी चालली. वर्षाच्या आतच या खटल्याचा निकाल लागून आरोपीला शिक्षा झाली. 
बातम्या आणखी आहेत...