आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला १२ वर्षे सक्तमजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपी अशोक वेताळ हाके (वय ४०, रुपनरवाडी, ता. पाथर्डी, जि. नगर) यास जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी मंगळवारी सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. फिर्याद दाखल झाल्यानंतर वर्षाच्या आत, तर सुनावणी सुरू झाल्यानंतर महिन्याचा आत न्यायालयाने हा खटला निकाली काढला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, आरोपी हाके याने बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर आरोपीच्या विराेधात पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. शिंदे यांनी तपास करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हा खटला जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर चालला. सरकार पक्षातर्फे सर्व महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीसह पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा युक्तिवादाच्या आधारे आरोपीला १२ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. अर्जुन पवार यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे फिर्याद दाखल झाल्यापासून एका वर्षाच्या आत, तर न्यायालयासमोर सुनावणी सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आत या खटल्याचा निकाल लागला.
बातम्या आणखी आहेत...