आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यासाठी १४ कोटींचा टंचाई आराखडा तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता यंदा कमी असेल असा अंदाज बांधला जात आहे. मागील वर्षी सुमारे ७० कोटी ५९ लाखांची तरतूद होती, यंदा त्यात ५६ कोटी ४४ लाखांची कपात करून अवघा १४ कोटी १४ लाखांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

पावसाळा संपल्यानंतर भूजलसर्वेक्षण करून टंचाई कृती आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू केली जाते. हा आराखडा जानेवारी ते जून या कालावधीसाठी असतो. आराखड्याला तीन महिने विलंब झाल्याने १४ कोटी १४ लाख ८३ हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात खासगी विहिरी अधिग्रहणसाठी सुमारे दोन कोटी, बैलगाडी, टँकरने पाणीपुरवठ्यासाठी कोटी, नळयोजनांच्या दुरुस्तीसाठी पावणेदोन कोटी, विंधन विहिरीसाठी सुमारे सव्वा दोन कोटी, तात्पुरत्या पुरक नळ योजना करण्यासाठी २७ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. यंदा बुडक्‍या खोदणे, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे या उपाययोजना वगळण्यात आल्या आहेत.

आराखड्यात ६५९ गावे दिड हजार वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. त्यावर हजार २०० उपाय योजना सूचवण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक ९२ गावे १४० वाड्या पाथर्डी तालुक्यातील आहेत. तर सर्वात कमी ११ गावे २८ वाड्या राहुरी तालुक्यातील आहेत. पारनेर नगर तालुक्यातील संभाव्य टंचाई विचारात घेऊन येथे सव्वा दोन कोटींची तरतूद केली. आराखडा तयार करताना जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीसाठी सुमारे सहा कोटी, एप्रिल ते जून या कालवधीसाठी कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली.

टँकर तरतुदीत ४४ कोटींची कपात
टँकरची तरतूद कमीमागील वर्षी टंचाई निवारणार्थ उपाय योजनांतर्गत टँकरवर सुमारे ५२ कोटी ६५ लाखांचा खर्च करण्यात आला होता. यंदा मात्र टँकरसाठी अवघी कोटी लाखांची तरतूद करण्यात आली. टँकरच्या पाणीपुरवठ्या तब्बल ४४ कोटी ६३ लाखांची कपात या तरतुदीत करण्यात आली आहे. या आराखड्यात ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी वगळण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...