आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा लाखांचे चंदन संगमनेरमध्ये पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सुमारे 15 लाख रुपये किमतीच्या चंदनाच्या लाकडाची तस्करी घारगाव (ता. संगमनेर) पोलिसांनी पकडली. घारगावजवळील खंडोबाचा माळ परिसरात एका टेम्पोतून जाणारी ही रक्तचंदनाची लाकडे पोलिसांनी ताब्यात घेतली असून दोघांना अटक करण्यात आली. अन्य तिघे फरार झाले. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घारगावचे पोलिस निरीक्षक वसंत तांबे यांना एम. एच. 42 टी 520 या क्रमांकाच्या टेम्पोतून आळेफाटामार्गे चंदनाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. संशयास्पद टेम्पो तेथून नाशिककडे जात असताना अडवण्यात आला. टेम्पोत चंदनाची लाकडे असल्याची खात्री पटताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पाच जणांपैकी दोघेजण हाती लागले. हाती लागलेल्या दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुलाब होनबा जाधव (40, सुरवड, ता. इंदापूर), शंकर भीमराव गायकवाड (32, कुडको, ता. शिरुर) अशी आरोपींची नावे आहेत. अजित यशवंत वाळुंज (शिरुर), शिवाजी बाबू मोरे (रामलिंग, ता. शिरुर) व तुकाराम रामा माने (रवंगडे, ता. जत) हे आरोपी फरारी आहेत.