आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘मूलभूत’मधून १५० कामे सुरू : महापौर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहराच्या विकासात आम्ही कधीही राजकारण आणले नाही. मात्र, युतीने राजकीय अस्तित्वासाठी मूलभूतच्या ४० कोटी रुपयांच्या कामात खोडा घातला. सरकार स्तरावर पाठपुरावा करून या कामांवरील स्थगिती उठवली असून मूलभूतच्या निधीतून १५० कामे सुरू करण्यात आली आहेत. यात ९० कामे रस्त्याची असल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केला.

मूलभूत योजनेतून सनमून चौक ते गाडगीळ पटांगण दरम्यान रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, नगरसेवक संजय घुले, अजय चितळे, राजेंद्र कवडे, सुनिल चितळे, रवी मंदुरे, अण्णा गहिले, दीपक गांधी, दत्तात्रय कवडे, मोहन ससे, राजाभाऊ पोतदार, विकास भंडारी, पंकज खराडे, पप्पू राक्षे, संतोष बैरागी, राजेंद्र बागडे, प्रवीण वाघ आदी उपस्थित होते.
कळमकर म्हणाले, मुलभूतमधून कामे मंजूर करताना विरोधक सत्ताधारी, असा भेदभाव केला नाही. गरज असणाऱ्या ठिकाणी कामे मंजूर करण्यात आली आहेत. गेल्या २५ वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या शहराचा सर्वांगिण विकासाला गती देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...