आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६ लाखांचे ब्रँडेड कपडे लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- श्रीरामपूरयेथील एच. यू. गुगळे वस्त्रदालन शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडून सुमारे १६ लाखांचे तयार कपडे लांबवले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा दिसत असून पालकमंत्री राम शिंदे यांच्या सूचनेनंतर तपासास वेग आला.
शिवाजी रस्त्यावर पालिका कार्यालयानजीक हे दुकान आहे. शनिवारी रात्री १० वाजता विनित जाजू आणि अन्य कर्मचारी काम आटोपून घरी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी कटावणी जॅकच्या साहाय्याने शटर उचकटवून आत प्रवेश केला. ब्रॅन्डेड कंपन्यांचे एक हजार शर्ट, पॅन्ट, शेरवाणी, सूट, टीशर्ट यांचे सुमारे १५ ते २० गाठोडे बांधण्यात आले. सहाच्या सुमारास दालनासमोर टाटा एसी टेम्पो लावण्यात आला. त्यातून दोघे उतरल्याचे आसपासच्या नागरिकांनी पाहिले. मात्र, इदचा सन असल्याने माल उतरवला जात असेल असे वाटल्याने कोणी हस्तक्षेप केला नाही. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दुकानाचे चालक महेश बंग, विनीत जाजू आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिसांना माहिती फुटेज देण्यात आले. पोलिसांनी प्रारंभी घटना गांभीर्याने घेतली नाही. केवळ वरवर चौकशी करून पोलिस निघून गेले. मात्र, रमेश गुगळे हे मंत्री शिंदे यांचे स्रेही असल्याने थेट वरून फोन आला आणि तपासाची चक्रे फिरली.

या दालनासमोर चहाची दोन हॉटेल आहेत. नगरपालिकेचे कर्मचारी पहाटेपासूनच साफसफाईची कामे करत असतात. शिवाय रस्त्याने जॉगिंग करणाऱ्यांचे प्रमाण मोठे असते. या सर्वांच्या नजरेतून एवढी मोठी घटना कशी सुटली याबाबत चर्चा सुरू आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरट्याच्या हालचाली.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
चोरट्यांपैकीएकाने सुरुवातीला दुकानात आल्यानंतर तोंडाला रूमाल बांधला. नंतर दुकानातील सर्व कॅमेऱ्यांच्या दिशा भिंतीच्या बाजूला केल्या. तोपर्यंत वाढलेली दाढी, घारे डोळे, पांढरा शर्ट, डोक्यात कॅप, हातात काळे ब्रेसलेट सुमारे साडेचार फूट उंची अशा वर्णनाच्या या चोरट्याच्या सर्व हालचाली कॅमेऱ्यात बंद झाल्या.
बातम्या आणखी आहेत...