आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळा कारखान्यांनी अडवले २७९ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-गळीत हंगाम संपून दीड महिना होत आला, तरी एफआरपीसाठी (किमान वाजवी दर) जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील १६ सहकारी खासगी साखर कारखान्यांनी उत्पादकांच्या हक्काचे तब्बल २७९ कोटी रुपये अडवून धरले आहेत. सरकारची आश्वासने शेतकरी संघटनांची आंदोलनेही एफआरपीची थकबाकी मिळवून देण्यात कुचकामी ठरली आहेत.

एकूण २२ पैकी खासगी १२ सहकारी साखर कारखान्यांनी यंदा गाळप केले. यंदाच्या हंगामात विक्रमी म्हणजे कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले. कोटी ३२ लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन झाले. साखरसम्राटांच्या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच नियम धाब्यावर बसवून एफआरपीप्रमाणे दर देण्याचे टाळण्यात आले. जानेवारीत ज्ञानेश्वर मुळा कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर अदा केला. हे दोन कारखाने नियमानुसार दर देत असताना बड्या नेत्यांनी मात्र एफआरपी थकवण्यातच धन्यता मानली.

ऊसदर आदेशानुसार एफआरपीची रक्कम १४ दिवसांच्या आत एकाच हप्त्यात शेतक-याना अदा करणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. नियमानुसार ही रक्कम अदा करणा-या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून कारवाई केली जाते. थकीत रक्कम जमीन महसुलाची थकबाकी वसुलीची प्रक्रिया राबवून जिल्हाधिकाच्या माध्यमातून वसूल करून शेतक-याना एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या सहा-सात महिन्यांपासून एफआरपी अडवून धरलेला असताना साखर आयुक्त सरकारही बोटचेपी भूमिका घेत आहे.

एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी केलेली घोषणा अजून हवेतच आहे. मुख्यमंत्री सहकारमंत्र्यांनी एफआरपी देणावर कारवाई करू, असे जाहीर केले. मात्र, एकाही थकबाकीदार कारखान्यावर कारवाई झालेली नाही
.
सरकार उदासीन
साखर कारखान्यांकडून एफआरपी मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मदत कारवाईच्या केवळ घोषणा सरकारकडून वारंवार केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात कृती होताना दिसत नाही. सहा-सात महिन्यांपासून एफआरपी थकीत असताना एकाही कारखान्यावर कारवाईचे धाडस सरकारने दाखवलेले नाही. जाणीवपूर्वक उदासीनता दाखवून सरकार हा प्रश्न चिघळवत आहे. एफआरपीचा घोळ घालून उत्पादनावर आधारित दराचा विषयच पुढे येऊ दिला जात नाही. यातून कारखानदार सरकारचे संगनमत स्पष्ट होते.'' बाळासाहेबपटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना.


अंतिम अहवाल पाठवतोय
हंगामसुरू झाल्यानंतर प्रत्येक पंधरवड्यात एफआरपी देणाऱ्या कारखान्यांचे अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवले आहेत. अहवालावर वरिष्ठ कार्यालयाकडून निर्णय होतो. हंगाम संपल्यानंतरचा अंतिम अहवाल पाठवण्याचे काम प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसात अंतिम अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.'' मिलिंदभालेराव, साखर सहसंचालक.
*अगस्ती : १८.२८
* अशोक : १२.०८
* प्रवरा : ३९.१९
*गणेश : १०.४१
* जगदंबा (अंबालिका) : ३३.४७
* कोपरगाव : १२.७३
* संगमनेर : २३.६९
* संजीवनी : १७.८८
* श्रीगोंदा : १४.६७
* वृद्धेश्वर : १४.८५
* कुकडी : ७.७२
* साईकृपा : ३.६८
*साईकृपा : ३९.८६
* गंगामाई : १६.५१
* प्रसाद शुगर: ८.९४
*जय श्रीराम: ४.५९
बातम्या आणखी आहेत...