आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरेबाजारला १७ देशांच्या अधिकाऱ्यांची भेट, जल मृद संधारण, ग्रामविकासाबाबत, प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आदर्शगाव हिवरेबाजारला नुकतीच १७ देशांमधील कृषी अधिकाऱ्यांनी भेट दिली. हिवरेबाजारमधील लोकसहभाग, नेतृत्व, प्रभावीपणे राबवलेल्या शासकीय योजना, त्यातून झालेला आर्थिक, सामाजिक, मानसिक बदल याचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.

हैदराबाद येथील राष्ट्रीय ग्राम पंचायत विकास प्रबोधिनीत विविध देशांमधील कृषी अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देण्यात येत आहे. शाश्वत शेती ग्रामविकास हा प्रशिक्षणाचा विषय आहे. विविध देशांमधील कमी पाऊस असलेल्या प्रदेशात जलसंधारण, मृदसंधारण, वनीकरण, तसेच शाश्वत पाण्याचे नियोजन ग्रामविकास याबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून अल्जेरिया, बांगलादेश, बोस्टवाना, आयव्हरी कोस्टा, केनिया, फिरगीस्तान, मॉरिशेस, मंगोलिया, म्यानमार, सरबिया, साऊथ सुदान, श्रीलंका, सिरीया, युगांडा आदी देशांमधील कृषी अधिकाऱ्यांनी हिवरेबाजारला भेट दिली. पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी हिवरेबाजारने २५ वर्षांत विकासाच्या दृष्टीने कसे शाश्वत झाले, याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.

...तर जगात कुठेही टंचाई नसणार
गावातीललोकसहभाग, नेतृत्व, तसेच शासकीय योजनांचा प्रभावी वापर याचे या कृषी अधिकाऱ्यांनी कौतूक केले. निसर्गाला कसे सामोरे जायचे, ते शिकायला मिळाले, टंचाईग्रस्त देशांसाठी हिवरेबाजारचा विकास दिशादर्शक ठरेल, हिवरेबाजारचे अनुकरण सर्वांनी केले, तर जगात कोठेही टंचाई जाणवणार नाही. आमच्या देशात असे आदर्श काम करण्याचा प्रयत्न करू, असे अधिकारी म्हणाले.

१७ देशांतील कृषी अधिकाऱ्यांनी आदर्शगाव हिवरेबाजारला भेट देऊन तेथील आर्थिक, सामाजिक विकास आणि झालेला मानसिक बदल याचा अभ्यास केला.
अभ्यास दौरा