आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८५ बालकांचे यशस्वी पुनर्वसन - बाल संरक्षण, ह्युमन ट्राफिकिंग, पोलिसांची कामगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बालकांचे संरक्षण त्यांच्या हक्कांकरिता आता गुन्हे शाखेचा ह्युमन ट्राफिकिंग सेल जिल्हा बालसंरक्षण कक्ष एकवटला आहे. केंद्र शासनाच्या महिला बालविकास विभागाने विविध राज्यांच्या बाल संरक्षण संस्थेसह संयुक्तपणे एकात्मिक बाल संरक्षण योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात नगरसह एकूण ३६ जिल्ह्यांमध्ये बाल संरक्षण कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत. बाल संरक्षण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखेचा ह्युमन ट्राफिकिंग सेल जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या मदतीने गेल्या वर्षभरात हरवलेल्या किंवा अपहृत झालेल्या १८५ बालकांना शोधून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

बाल संरक्षण कक्षाच्या पुढाकाराने तालुका ग्राम पातळ्यांवर बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याची मोहीम सुरू आहे. नगर जिल्ह्यात फेब्रुवारी २०१३ पासून बाल संरक्षण कक्ष कार्यरत आहे. बालकांसदर्भात विविध विभागांकडून आकडेवारी माहिती घेण्याचे काम या कक्षाने केले आहे. विधिसंघर्षग्रस्त, विधिसंपर्कग्रस्त, काळजी संरक्षणाची गरज असलेली बालके यांच्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये विशेष बाल पोलिस पथके नेमण्यात आली आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने या विशेष बाल पोलिस पथकातील पोलिसांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हरवलेल्या सापडलेल्या बालकांसदर्भात त्यांच्या पुनर्वसनाबाबत संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याबाबत जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाळा हेडे यांनी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण दिले. पोलिस मुख्यालयात आयोजित या कार्यशाळेला जिल्ह्यातील ३० पोलिस ठाण्यांतील २१ अधिकारी ४१ कर्मचारी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार हरवलेल्या बालकांच्या संदर्भात ऑपरेशन स्माईल दोन ही शोधमोहीम ते ३१ जानेवारी या कालावधीत राबवली जाणार आहे.
जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून २१७ बालकांचे अपहरण होण्याचे प्रकार घडले. संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेंतर्गत असलेल्या ह्युमन ट्राफिकिंग सेल जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे तब्बल १८५ बालकांना शोध्ून पालकांच्या हवाली करण्यात अाले. काही विधी संघर्षग्रस्त बालकांना पुन्हा निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. पोलिस जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांमुळेच बालकांच्या हक्कांची जपवणूक करण्यात यश येत आहे.

जानेवारीत 'आॅपरेशन स्माईल'
गेल्यावर्षभरात बालकांच्या अपहरणाचे १९८ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले. त्यामध्ये २१७ बालकांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १८५ बालकांना शोधून पुन्हा पालकांच्या हवाली करण्यात आले आहे. या वर्षी अवघ्या दहा दिवसांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागात ऑपरेशन स्माईल राबवण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत अवघ्या दहा दिवसांमध्ये बालक, मुली, ११ पुरुष १४ स्त्रियांना शोधून काढण्यात आले आहे. शासनाचे विविध विभाग एकत्र येऊन संपूर्ण जानेवारी महिनाभर ऑपरेशन स्माईल राबवणार आहेत. याला पहिल्याच आठवड्यात चांगले यश आले.