आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 196 Resource Group Persons Post Cancalled Sarva Shisksha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सर्व शिक्षा’तील 196 गटसाधन व्यक्तींची पदे रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रतिनियुक्तीवरील गटसाधन व्यक्तींची 196 पदे शासनाने रद्द केली आहेत. या शिक्षकांचे समायोजन करावे लागणार आहे. रिक्त पदांच्या तुलनेत रद्द पदांची संख्या जास्त असल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील 196 शिक्षकांची काही वर्षांपूर्वी सर्व शिक्षा अभियानांतर्गत साधनव्यक्ती म्हणून प्रतिनियुक्ती झाली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षकांच्या पदांवर इतर शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. आता केंद्र सरकारने 31 मार्चनंतर गटसाधन व्यक्तींचे वेतन काढणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे रद्द झालेल्या पदांचे समायोजन करणे आवश्यक झाले आहे. सध्या फक्त दहा ते पंधरा शिक्षकांचीच पदे रिक्त असल्याने रद्द पदांचे समायोजन कसे करायचे हा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे.