आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुझ्या वडीलांशी भांडण झाले आहे म्‍हणत मुलीवर केला बलात्‍कार, नगरमध्‍ये 2 आरोपी गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- एका व्यक्तीशी झालेल्या भांडणातून दोघांनी त्याच्या मुलीवर बलात्कार करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी बुरूडगाव रस्ता परिसरात घडला. कोतवाली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. चार्ल्स झेंड्या चव्हाण शाबीर झेंड्या चव्हाण (बुरूडगाव रस्ता) अशी आरोपींची नावे आहेत.
 
याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती रस्त्याने पायी जात असताना दोन्ही आरोपींनी तिला रस्त्यात अडवले. आमचे तुझ्या बापाशी भांडण झाले, तुला माहिती आहे का, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ दमदाटी केली. युवतीने त्यांना विरोध केला असता दोघांनी तिला दांडक्याने मारहाण केली. शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर आडोशाला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत चार्ल्स शाबीर चव्हाण यांना अटक केली.
बातम्या आणखी आहेत...