आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोमांस भरलेल्या ट्रकसह दोनजण नगरमध्ये ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गोवंशीय जनावरांच्या मांसाची बेकायदा वाहतूक करणारा ट्रक भिंगार कॅम्प पोलिसांनी चांदणी चौक परिसरात सापळा रचून पकडला. ट्रकसह एकूण लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे ही कारवाई केली. 
 
वाहनचालक महंमद अली खान (वय ४५, नाईकवाडपुरा) पाशामिया कुरेशी (वय ४०, भारतनगर, संगमनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कोठलामार्गे सोलापूर रस्त्याने गोमांस वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती भिंगार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक देशमाने, फौजदार गजानन करेवाड, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलिस नाईक राजेंद्र सुद्रिक, जंबे, शिंदे, राहुल द्वारके, अडसूळ आदींच्या पथकाने सापळा रचून ट्रक अडवला. ट्रकमध्ये (एमएच ०४ एफडी ७१९०) बाराशे किलो वजनाचे लाख ४४ हजार रुपये किमतीचे गोमांस बर्फाचे तुकडे आढळून आले. पोलिसांनी मुद्देमालासह दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मोटार वाहन कायद्यासह महाराष्ट्र प्राणीरक्षा अधिनियमाच्या कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास फौजदार गजानन करेवाड करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...