आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: टेम्पो-कारची समोरासमोर धडक बसून दोनजण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - टायर फुटून ताबा सुटल्याने आयशर टेम्पोला कारवर धडकून दोनजण ठार झाले. हा अपघात नगर-औरंगाबाद रस्त्यावर इमामपूर घाटात गुरूवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. काही नागरिकांनी मृतांना वाहनातून बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. 
 
सचिन चंद्रकांत कुटे (रा. चाकण, पुणे वय ३५), ऋषिकेश सुरेश नलावडे (वय १८, विश्रांतवाडी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. तर अमित बजरंग माने (वय २८, चाकण) हे जखमी झाले आहेत. मारुती झेन कार (एमएच १४ एएच ९४८४) औरंगाबादहून नगरच्या दिशने येत होती. त्याच वेळी नगरहून औरंगाबादच्या दिशेने विनाक्रमांकाची आयशर टेम्पोची चेसी जात होती. कारचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार समोरुन येणाऱ्या चेसीवर धडकली. या अपघातात कारमधील दोघे ठार झाले. 
 
काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तत्काळ मदत करत कारमधून दोघांनाही बाहेर काढले. एमआयडीसी पोलिस घटनास्थळी जाईपर्यंत नागरिकांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केले होते. अपघातानंतर चेसीचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी त्याला पांढरीपूल परिसरात ताब्यात घेतले. 
बातम्या आणखी आहेत...