आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; हिंगणी बंधाऱ्यातील दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यात शहरातील बारावी वाणिज्य शाखेत एसएसजीएम महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले चार विद्यार्थी हिंगणी येथील बंधाऱ्यावर गोदावरीच्या प्रवाहात आंंघोळीसाठी गेले असता त्यातील सार्थक किशोर सोनवणे (१७, निवारा सोसायटी) सार्थक संतोष लांडे (१७, लक्ष्मीनगर) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 
 
एसएसजीएम महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत असलेल्या चार विद्यार्थी शनिवारी सकाळी ११ वाजणेचे सुमारास हिंगणी बंधाऱ्यावर गेले. तेथे गोदावरी पात्रात ही मुले पाण्यात उतरले. पाणी किती खोल आहे, याचा अंदाज चौघांनाही आला नाही. चौघेही बुडू लागले. त्यापैकी दोघांनी जीव वाचवण्यात यश मिळवले. परंतु सार्थक सोनवणे सार्थक लांडे हे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. या मुलांना वाचवण्यासाठी त्यांच्या मित्रांनी आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा करून प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. याबाबत कोपरगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल ए. बी. बाबर पुढील तपास करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...