आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये उद्या लावणार २० लाख झाडे, नगर शहरातही होणार चार हजार शंभर वृक्षारोपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यात एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड करण्याच्या राज्य सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून शुक्रवारी जिल्ह्यात १९ लाख ६८ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमात सर्व सरकारी विभाग सहभागी होणार अाहेत. एकट्या नगर शहरात चार हजार शंभर झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक चंद्रकांत तांबे यांनी दिली.

पर्यावरणाचा ऱ्हास, तापमानातील चढउतार, घटलेला बेभरवशाचा पाऊस, वाढलेले हरित वायूंचे प्रमाण याला वृक्ष आच्छादनात झालेली चिंताजनक घट हेच मुख्य कारण आहे. राज्यातील वृक्ष आच्छादन वाढवण्याचा निर्णय राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. राज्यात वृक्ष लागवडीचे दोन कोटींचे उद्दिष्ट आहे. ही वृक्षलागवड एकाच दिवशी म्हणजे एक जुलै रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे तांबे यांनी सांगितले.
सरकारने ३० मार्च रोजी याबाबत परिपत्रक काढले. तसा तयारीला खूप कमी वेळ होता. मुळात रोपवाटिकांची कामे दहा महिन्यांपूर्वीच सुरू झाली असल्याने रोपांची उपलब्धता हा मोठा प्रश्न होता. सुदैवाने जिल्ह्यात पुरेशी रोपे उपलब्ध आहेत. पाण्याची तीव्र टंचाई असली, तरी सामाजिक वनीकरण विभाग प्रादेशिक वन विभागाने मोठ्या प्रमाणात रोपे तयार करून जगवली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाकडे लाख ६० हजार ३३६, तर वनविभागाकडे १६ लाख ६४ हजार रोपे उपलब्ध आहेत. मूळ उद्दिष्ट १६ लाख ७० हजारांचे होते. ते आता १९ लाख ८५ हजारांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक रोपे उपलब्ध असल्याचे तांबे म्हणाले.

अशी झाली तयारी
सरकारने परिपत्रक काढल्यावर तांबे यांनी जिल्ह्यातील गावनिहाय उद्दिष्टाचा तक्ता तयार केला. त्यातून उपलब्ध जागा लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तालुकानिहाय विभागनिहाय रोप लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले. अगदी तालुका पातळीपासून सर्व सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक ई-मेल पत्त्यांची यादी तयार केली. या मोहिमेच्या प्रसारासाठी व्हॉटस्् अॅप ग्रूप फेसबुक पेजही तयार केले. आपल्या विभागाच्या सर्व रोपवाटिका प्रमुखांचे मोबाइल क्रमांक त्यांनी व्हॉटस् अॅप ई-मेलवर पाठवले. आता कोणत्या विभागाला किती झाडे हवीत त्यांनी ती कोठून न्यायची, हे सर्व काटेकोर नियोजन केल्याने हा उपक्रम निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकटा वन विभाग एक जुलै रोजी आठ लाख रोपांची लागवड करणार असल्याचे उपवनसंरक्षक गुलाबराव वळसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, वनविभाग ते जुलैदरम्यान एकूण १५ लाख ४८ हजार ४८७ रोपांची लागवड करणार आहे. नगर वनविभागात राहुरी (२ लाख ७९ हजार), कर्जत (१ लाख ४७ हजार ७०), पारनेर (१ लाख हजार ३२०), पाथर्डी (२ लाख ६० हजार १९५), तिसगाव (१ लाख ३६ हजार ५७०), नगर (२ लाख ५८ हजार ५४०), टाकळी ढोकेश्वर (३ लाख ५९ हजार ९००) असे उद्दिष्ट आहे.

पारनेर तालुक्यामध्ये सर्वाधिक उद्दिष्ट
यंदासर्वाधिक उद्दिष्ट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यात आहे. पारनेर टाकळी ढोकेश्वर वन परिक्षेत्र मिळून लाख ६७ हजार २२० रोपे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी जुलै रोजी लाख ५५ हजार ५७० रोपे लावण्यात येतील.

सर्व विभाग होणार सहभागी
याउपक्रमात सामाजिक वनीकरण विभाग प्रादेशिक वन विभागाशिवाय महसूल, नगर विकास, गृह, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, उद्योग विकास, ऊर्जा विभाग, आरोग्य, शिक्षण, भूजल, सहकार, पाटबंधारे, कृषी, परिवहन आदी २० विभागांसह नगर परिसरातील आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) हे लष्करी विभागही सहभागी होणार आहेत. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होणार आहेत.

झाडे जगवण्याचेही आवाहन
पतंगरावकदम वनमंत्री असताना दशकोटी वृक्षलागवड करण्याचे ठरवले, पण रोपांच्या उपलब्धता गांभीर्याच्या अभावामुळे ही योजना फसली. काही प्रमाणात झाडे तर लावली गेली, पण ती जगली नाहीत. उपग्रहांद्वारे राज्यातील हिरवाईचे सर्वेक्षण झाले तेव्हा असे लक्षात आले की, हे हिरवे टापू प्रामुख्याने नैसर्गिक जंगले लष्कराने विकसित केलेले होते. फक्त झाडे लावून उपयोग नाही, तर ती जगवण्याचेही नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी रोपांभोवती कमीत कमी संरक्षक कवच उभारण्याचे, तसेच जपलेल्या झाडाचा पहिला वाढदिवस पुढच्या वर्षी साजरा करावा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.

देशी वृक्ष लावणार
याउपक्रमात प्रामुख्याने निम, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, करंज, वावळा, आवळा, बहावा, शिसू, सीताफ‌ळ आदी स्थानिक प्रकारची झाडे प्रामुख्याने लावली जाणार आहेत. काही प्रमाणात काशीद गुलमोहोराचीही झाडे लावण्यात येतील. कारण त्यांना नागरिकांकडून मागणी आहे. पुढील वर्षी कोणती झाडे लावायची, यासाठी या क्षेत्रातील जाणकारांची बैठक घेऊन त्यांच्याकडून सूचना घेणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. त्यानुसार त्या झाडांचे बी उपलब्ध करून त्यांची रोपे तयार करण्यात येणार आहेत.

हिरवाईत भर पडणार
एकट्यानगर शहरात या उपक्रमांतर्गत चार हजार वृक्ष लागवड होणार आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यातील निम्मी झाडे वाढली, तरी नगरच्या हिरवाईत मोठी वाढ होणार आहे. कारण दरवर्षी महापालिका झाडे लावण्यासाठी नगरकरांकडून कर वसूल करते, पण झाडे मात्र लावत नाही. पर्यावरणाबाबत गांभीर्यच नसल्याने हा निधी भलतीकडे वळवला जातो. आता दोन कोटी वृक्षलागवडीच्या सरकारी उपक्रमामुळे शहरातील हिरवाईत निश्चित वाढ होईल, असा विश्वास वन विभागातील सूत्रांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...