आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 22 Coror Profit To Sangamner Taluka Doodh Mahasangh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तालुका दूध संघाला बावीस कोटींचा नफा : मंत्री थोरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- दुग्ध व्यवसायाला दिशादर्शक ठरलेल्या संगमनेर तालुका दूध संघाने यावर्षी दूध उत्पादकांना दुष्काळात दिलासा देतानाच प्रतिलिटर 1 रुपया 30 पैसे रिबेट देण्याचा निर्णय घेतला. संघाला यंदा 22 कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघाची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रामनाथ राहाणे होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, पंचायत समितीच्या सभापती सुरेखा मोरे, अविनाश सोनवणे, रणजितसिंह देशमुख, अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित या वेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, दूध संघाच्या प्रशासकीय काळाचा अपवाद वगळला, तर संघाची 35 वर्षांची वाटचाल यशस्वीच नव्हे, तर तिचा आलेख प्रगतीचा राहिला आहे. सामान्य शेतकर्‍याला चांगले जीवन जगण्यासाठी शेतीबरोबरच जोडधंद्याची गरज ओळखून भाऊसाहेब थोरात यांनी संघाची स्थापना केली. राजहंसच्या दूधाला राज्य व देशभरातून मोठी मागणी आहे. त्यामुळे दूध संकलन तीन लाखांवरुन पाच लाखांवर जायला हवे, अशी अपेक्षा मंत्री थोरात यांनी व्यक्त केली.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, दूध संघाने मोठी झेप घेतली आहे. येथील सहकारी चळवळीने राज्यात आदर्श निर्माण केला आहे. मात्र, यापुढील काळात दूधधंद्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता चारा व व्यवस्थापनावरील खर्च कमी करीत सरासरी दूध उत्पादन वाढवले पाहिजे.