आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 23 Register Offices Starts In State Balasaheb Thorat

राज्यात आणखी 23 दुय्यम निबंधक कार्यालये होणार - बाळासाहेब थोरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - राज्याच्या महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण ठरणा-या नोंदणी व मुद्रण विभागाच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर या विभागाच्या सुलभता आणि पारदर्शकता यावी यासाठी राज्यात आणखी 23 दुय्यम निबंधक कार्यालये नव्याने स्थापन केली जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले, राज्यभरात नव्याने आणखी 23 निबंधक कार्यालये वाढवली जाणार आहेत. या कार्यालयांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळदेखील सरकारमार्फत पुरवले जाणार असल्याने या खात्याच्याही कामकाजात आमूलाग्र बदल येत्या काही दिवसांत जाणवू लागतील. सध्या राज्यभरात 464 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्यांच्या आधुनिक व नूतनीकरणासाठी थोरात यांनी 2011 मध्ये 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून संबंधित कार्यालयांची कामे प्रगतिपथावर असतानाच आता त्यात आणखी 23 नवीन कार्यालयांची व आवश्यक मनुष्यबळाची भर पडेल. त्यामुळे या विभागातील कामास आता आणखी गती मिळणार असून सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे दस्त नोंदणी व आनुषंगिक सेवा योग्य प्रकारे नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
23 कार्यालयांचा निर्णय ऐतिहासिक
राज्यभरात 23 दुय्यम निबंधक कार्यालये व त्यासाठी आवश्यक असलेल्या 60 नवीन पदांच्या निर्मितीचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, महाराष्‍ट्र राज्य.