आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगर जिल्ह्यातील 23 सोनोग्राफी केंद्रांची मान्यता रद्द करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यातील 23 सोनोग्राफी केंद्रांत सोनोग्राफी तज्ज्ञ नसल्याने त्यांची मान्यता रद्द करून बंद करण्यात येणार आहे. तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर यांनी दिली.
गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायद्यानुसार सल्लागार समितीची बैठक मंगळवारी झाली. यावेळी डॉ. निटूरकर बोलत होते. डॉ. सुधा कांकरिया, डॉ. सी. डी. मिर्शा, डॉ. अनिल कुर्‍हाडे, डॉ. ए. एच. ससे, डॉ. रार्जशी मांढरे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात खासगी रुग्णालय तसेच व्यावसायिकांना पीएनडीटी केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. केंद्रांना परवानगी देताना त्याची खरोखर गरज आहे का याची चौकशी करूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना उपस्थितांनी मांडल्या.
निटूरकर म्हणाले, सोनोग्राफी तज्ज्ञ दोनपेक्षा जास्त सोनोग्राफी केंद्राला भेटी देणे टाळतात. त्यामुळे बरीच केंदे बंद करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सोनोग्राफी केंद्राचे 30 दावे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. पाच दाव्यांचा निकाल शासनाच्या विरोधात असल्याने या निकालाविरोधात जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. तसेच विनापरवाना सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यासाठी डॉक्टर संघटनांची मदत घेण्यात येणार आहे. नियमानुसार सोनोग्राफी तज्ज्ञ नसल्यामुळे जिल्ह्यातील 23 सोनोग्राफी केंद्रे बंद करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.