आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावेडीकरांसाठी आता २४ तास घंटागाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-वारुळाचा मारुती परिसरात कचरा डेपोसाठी रॅम्प बांधण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. निधीअभावी हे काम रखडले होते. परंतु आता हे काम बीआरजीएफ निधीतून होणार आहे. रॅम्पच्या कामामुळे सावेडी क्रीडा संकुलाच्या जागेवरील कचरा उचलण्यात येणार असल्याने सावेडीतील नाट्यगृहाच्या बांधकामाचा मार्गही मोकळा झाला आहे.

सावेडी उपनगरातील कचऱ्याचे संकलन करून तो प्रोफेसर कॉलनी चौकातील क्रीडा संकुलाच्या जागेत टाकला जातो. तेथून हा कचरा भरून बुरूडगाव कचरा डेपोत नेला जातो. त्यामुळे क्रीडा संकुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. या जागेवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे सावेडी नाट्यगृहाचे काम रखडले आहे. जोपर्यंत कचरा उचलला जात नाही, तोपर्यंत नाट्यगृहाचे काम सुरू करणे कठीण आहे. या कचऱ्याची वलि्हेवाट लावण्यासाठी मनपा प्रशासनाने वारुळाचा मारुती परिसरात जागा निश्चित केली. या जागेवर रॅम्प बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. मात्र, निधीअभावी रॅम्पचे काम रखडले होते. आता बीआरजीएफच्या निधीतून रॅम्पचे बांधकाम करण्यास मंजुरी मिळाली आहे. रॅम्पचे काम पूर्ण होताच क्रीडा संकुलाच्या जागेवरील कचरा उचलण्यात येणार आहे. त्यानंतर नाट्यगृहाचे रखडलेले काम सुरू होईल.

खासगीकरणाच्या माध्यमातून कचरा संकलन, तसेच क्रीडा संकुलातील कचऱ्याच्या दुर्गंधीपासून सावेडीकरांची कायमची सुटका होणार आहे. मनपा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे कचरा संकलन, नाट्यगृह, तसेच क्रीडा संकुलातील कचरा, हे तिन्ही प्रश्न लवकरच सुटतील, अशी अपेक्षा आहे.
पुढिल स्लाईड वर वाचा 'रॅम्प चा मार्ग मोकळा'
बातम्या आणखी आहेत...