आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४२ वाळूसाठ्यांना पर्यावरणचा नकार, विविध कारणे दाखवून प्रस्ताव फेटाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्याच्या पर्यावरण विभागाने नगर जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमधील २४२ वाळूसाठ्यांच्या लिलावांना विविध कारणे दाखवून परवानगी नाकारली अाहे. ३०४ वाळूसाठ्यांपैकी केवळ ६४ साठ्यांच्या लिलावांना परवानगी देण्यात आली, अशी माहिती मिळाली. जिल्हा प्रशासनाने २०१६-१७ या वर्षासाठी कोपरगाव, राहाता, नेवासे, पारनेर, श्रीगोंदे, संगमनेर, अकोले, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी शेवगाव या तालुक्यांतील मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सीना या नदीपात्रांमधील ३०४ वाळूसाठे लिलावासाठी निश्चित केले होते.
निश्चित करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांच्या छायाचित्रांसह प्रस्ताव गौण खनिज विभागामार्फत राज्याच्या पर्यावरण विभागाला पाठवण्यात आला होता. पर्यावरण विभागाने जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या ३०४ वाळूसाठ्यांपैकी केवळ ६४ साठ्यांच्या लिलावांना परवानगी दिली आहे. उर्वरित २४२ वाळूसाठ्यांना पर्यावरण विभागाने विविध कारणे दाखवून परवानगी नाकारली आहे. परवानगी देण्यात आलेल्या ६४ पैकी साठ्यांची प्रकरणे प्रलंबित असून, उर्वरित ६२ वाळूसाठ्यांचे लिलाव होणार आहेत, अशी माहिती गौण खनिकर्म अधिकारी संजय ब्राह्मणे यांनी दिली.

गेल्या तीन महिन्यांपासून ऑनलाइन वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत तीन वेळा झालेल्या ऑनलाइन लिलावात दहा वाळूसाठ्यांचे लिलाव झाले असून, त्यातून तीन कोटींचा महसूल प्रशासनाला मिळाला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी १७९ वाळूसाठ्यांचे ऑनलाइन लिलाव होणार होते. मात्र, तब्बल आठ वेळा लिलाव घेऊन १७९ पैकी केवळ २५ वाळूसाठ्यांचे लिलाव झाले होते. १५३ वाळूसाठ्यांचे िललाव जून अखेरपर्यंत झालेच नाहीत. त्यामुळे प्रशासनाने पावसाळ्याचे कारण पुढे करून जुलै महिन्यापासूनच वाळू लिलावाची प्रक्रिया थांबवली होती. १५३ वाळूसाठ्यांचे लिलाव झाल्यामुळे गेल्या वर्षी पंधरा ते वीस कोटींच्या महसुलावर प्रशासनाला पाणी सोडावे लागले होते.

यंदाही ऑनलाइन वाळू लिलावांना कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे महसुलात घट होण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी लिलावांना कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे या वर्षासाठी ऑक्टोबरपासून ऑनलाइन लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी वाळू लिलाव बोली पध्दतीने होत असे. नंतर त्यात बदल करून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. ऑनलाइनच्या किचकट प्रक्रियेमुळे लिलावांकडे व्यावसायिक पाठ फिरवत आहे. एकीकडे वाळू लिलावांना प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे मात्र नदीपात्रांमधून चोरट्या मार्गाने वाळूउपसा सुरूच आहे.

चोरट्या मार्गाने उपसा
संगमनेर, कोपरगाव, नेवाशासह अन्य तालुक्यांमधील नदीपात्रांमधून रात्री चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल सध्या बुडतो आहे. पोलिस, आरटीओ महसूल या विभागांची एकत्रित पथके जिल्ह्यात कार्यरत आहेत. तथापि, या तिन्ही विभागांत समन्वय नसल्यामुळे वाळूचोरांचे फावते आहे.