आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा वर्षांत १९५; सहा महिन्यांत २५ आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण आता नगर जिल्‍हात येऊन पोहोचले आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर जिल्‍हात वर्षभरात ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अलीकडे म्हणजे केवळ ३ ते १४डिसेंबरदरम्यान जामखेड, कर्जत व पारनेर या तालुक्यांतील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागील बारा वर्षांत एकूण १९५, तर मागील सहा महिन्यांत २५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आतापर्यंत केवळ ८९ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाच्यानिकषांप्रमाणे आर्थिक मदत मिळाली.
"शेतकऱ्यांनो, आत्महत्या करु नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनदिवसांपूर्वी करुनदेखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मराठवाडा वविदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. हे लोण हळूहळू नगर जिल्‍हात येत आहे. गेल्या वर्षभरात जिल्‍हातील ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक नऊ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. जामखेडमध्ये ५, श्रीगोंदे ४, संगमनेर ५, तर राहाता तालुक्यात ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मागील अकरादिवसांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
मार्च महिन्यात ९, जूनमध्ये ७, नोव्हेंबरमध्ये ६ वडिसेंबरमध्ये २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ३डिसेंबरला जामखेड तालुक्यातील िशऊर येथील दादा विश्वनाथ तनपुरे (४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेवा संस्थेचे ७० हजारांचे कर्ज त्यांच्यावर होते. १३डिसेंबरला पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथील हरिभाऊ गणपत झावरे (६५) या शेतकऱ्यानेविषारी आैषध सेवन करुन अात्महत्या केली. त्यांच्यावरही सेवा संस्था व अन्य संस्थांचे २ लाखांचे कर्ज होते. कर्जत तालुक्यातीलमिरजगाव येथील कल्याण हौसराव बाबर (४५) या शेतकऱ्याने रविवारी (१४ डिसेंबर)विषारी आैषध सेवन करुन आत्महत्या केली.

िडसेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात तब्बल तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. नोव्हेंबर महिन्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
..तरच थांबतील आत्महत्या
- राज्य सरकारचे पॅकेज भ्रष्टाचाराची व्यवस्था पोसण्यासाठी आहे. शेतकरी संघटनेचा या पॅकेजलाचविरोध आहे. शेतीमालाला रास्त भाव जोपर्यंतमिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. या अगोदरच्या सरकारनेही पॅकेजदिले. मात्र, ते कागदावरच राहिले.''
बाळासाहेब पटारे,विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना.
२००६ पासून वाढल्या आत्महत्या
सर्वाधिक आत्महत्या २००६ मध्ये झाल्या. २००६ मध्ये ४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २००७ मध्ये २८, २००८ मध्ये १३, २००९ मध्ये १२, २०१० मध्ये ७, २०११ मध्ये ६, २०१२ मध्ये १४, तर २०१३ मध्ये २७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यंदा जून ते १५डिसेंबरपर्यंत ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. २००४ ते २०१३ पर्यंत १५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील ७८ शेतकऱ्यांना शासकीयनिकषांप्रमाणे आर्थिक मदत करण्यात आली आहे.
शेतीविषयक धोरण बदला...

- शेतीविषयक धोरण बदलत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. देशभरातील शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त केले पाहिजे. शेतीमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान सरकार करत आहे. शेती जुगारासारखी झाली आहे. भावाची खात्री असल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाहीत.'' अनिल धनवट, राज्य कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना.