आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुखद सोमवार: 2,500 बेरोजगार युवकांना मिळाली एकाच दिवशी नोकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेळाव्याचे उद््घाटन करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. - Divya Marathi
मेळाव्याचे उद््घाटन करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.

नगर- पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या पोलिस पाल्य पारधी समाजातील मुला-मुलींच्या नोकरी मेळाव्यात एकाच दिवशी तब्बल हजार ५४० बेरोजगारांना नोकरी मिळाली. मेळाव्यात नाशिक परिक्षेत्रातील तब्बल हजार २०० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले. त्यानंतर मेळाव्यात सहभागी ५२ मल्टीनॅशनल कंपन्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नियुक्तीपत्र दिले. 


नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार नगरमधील पोलिस पाल्य पारधी समाजाच्या मुला-मुलींसाठी जिल्हा प्रोलिस प्रशासनाने न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले. याप्रसंगी पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, पारधी समाजाचे नेते प्रा. िकसन चव्हाण, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, नोकरी मेळाव्याचे आयोजक किरण रहाणे, ग्रामीणचे नूतन सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया आदी उपस्थित होते. 

 

गुन्हेगारी जात, असा शिक्का बसलेल्या पारधी समाजाच्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील परिक्षेत्रासाठी नगरमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. या मेळाव्यात पोलिसांच्या मुलांनाही सहभाग घेतला. पोलिस पाल्य पारधी समाजाच्या हजार २०० मुलां-मुलींनी मेळाव्यात सहभाग घेतला. मल्टीनॅशनल ५२ कंपन्यांनी सहभागी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी हजार ५४० मुला- मुलींची नोकरीसाठी निवड करण्यात आली. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते ८० उमेदवारांना नियुक्तीपत्रदेखील देण्यात आले. केवळ नाशिक परिक्षेत्रच नव्हे, तर राज्यभरातील पोलिस पारधी समाजातील मुला-मुलींनी मेळाव्यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सहभागी सर्व मुलांना वर्षभरासाठी एक जॉब कार्ड मोफत देण्यात आले. ज्या मुलांना मेळाव्यात नोकरी मिळाली नाही, अशांना या कार्डच्या माध्यमातून वर्षभर नोकरीचा शोध घेता येणार आहे. 


तुमची जबाबदारी आम्ही घेतली 
आई-वडिलांवर कधी अवलंबून राहिलो नाही. तुम्ही देखील मिळेल ती नोकरी करून स्वत:च्या पायावर उभे रहा, असे आवाहन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा मेळाव्यात सहभागी पोलिस पाल्य पारधी समाजाच्या मुला-मुलींना केले. प्रत्येक ठिकणी काही ना काही शिकायला मिळते, तुम्ही फक्त सुरूवात करा, आता तुमची जबाबदारी आम्ही घेतली आहे, अशी देखील साद शर्मा यांनी यावेळी दिली. 


घरात अडकू नका 
ग्रामीण युवक मुलाखतीत मागे पडतात. त्यासाठी कौशल्य आत्मविश्वास लागेल. खेड्यातून आलो आहोत, चांगले कपडे नाहीत, यात गुरफटू नका. सर्वात अगोदर घर सोडा, बाहेर पडताला, तरच चांगले भविष्य आहे. उपजिवीकेचे साधन शोधा, त्यातूनच गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, असे आवाहन जॉब शोकेसचे िकरण रहाणे यांनी यावेळी बोलताना केले. 

बातम्या आणखी आहेत...