आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळगाव शिवारामध्ये बस ट्रकच्या अपघातात 28 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - तालुक्यातील दौंड-नगर मार्गावर कोळगाव शिवारात शुक्रवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास एसटी बस ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात २८ प्रवाशी जखमी झाले. कोळगाव ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले, तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगरला हलवण्यात आले. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आर. टी. शिंदे यांनी बसचालक विष्णू खेडकर ट्रकचालक योगेंद्रकुमार मीना यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 
श्रीगोंदे आगाराची बस एमएच १४ बीटी ३५१९ नगरवरून श्रीगोंद्याकडे येत होती. ट्रक आरजे २० जीबी २५१४ दौंडकडून नगरकडे जात होता. या दोन्ही वाहनांची कोळगाव शिवारातील कावेरी हॉटेलसमोर शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात बसचा चालक विष्णू खेडकर, प्रवाशी शायदा शेख (दोन्ही श्रीगोंदे) भानगाव येथील प्रवाशी बाळासाहेब पवार हे जबर जखमी झाले. बसमधील अन्य २५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. कोळगाव येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. तिघा जखमींना बेलवंडी पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी नगरला हलवले. अपघातग्रस्त बस श्रीगोंदे आगाराची असून ट्रक राजस्थान येथील आहे. शिवसेना नेते घनश्याम शेलार पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. 
बातम्या आणखी आहेत...