आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: उमेदवाराने दिलेल्या ओल्या पार्टीत अतिमद्य सेवनाने पाच जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारानंतरची ओली पार्टी पाच जणांच्या जीवावर बेतली आहे. अतिमद्य सेवनाने जिल्ह्यातील जेऊर येथील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण अत्यवस्थ आहेत. जेऊर गटातील पांगरमल गावात सोमवारी रात्री निवडणुकीच्या प्रचारानंतर उमेदवाराने दिलेल्या पार्टीत ही घटना घडली आहे.

राजेंद्र खंडू आंधळे, पोपट रंगनाथ आव्हाड, दिलीप रंगनाथ आव्हाड (रा. पांगरमल)  प्रभाकर शिवाजी पेटारे (रा. दत्ताजी शिंगवे, ता. नगर) अशी मृतांची नावे आहेत.
 
सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचारानंतर सायंकाळी ओल्या पार्ट्यांना ऊत आला आहे. पार्टीत मांसाहारी जेवणाआधी मद्यांच्या बाटल्याही फुटत आहे. दरम्यान रविवारी (दि. ११) रात्री पांगरमल येथे एका उमेदवाराची पार्टी झाली. यानंतर सोमवारी गावातील काही जणांची प्रकृती बिघाडली. यामुळे त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री राजेंद्र आंधळे, पोपट आव्हाड आणि दिलीप आव्हाड यांचा मृत्यू झाला. तर मंगळवारी सकाळी  प्रभाकर पेटारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
या प्रकरणी जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...