आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्‍याचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - शाळकरी मुलाचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन खतरनाक गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाइल अटक केली.
काय आहे प्रकरण ?
सोनईचे (ता. नेवासे) पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे यांचा मुलगा सार्थक (वय 9) याचे बुधवारी अपहरण झाले होते. अपहरणकर्त्‍यांनी गुगळे यांना दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्‍यान, गुगळे यांनी पोलिसांत माहिती दिली.
सापळा रचून केली अटक
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्‍या 24 तासांत सोनई परिसरातील तिघांना अटक केली. नवनाथ बबन लष्करे, गणेश वडघुले, आणि तानाजी कुसळकर अशी आरोपींची नावे असून, या सर्वांवर यापूर्वी वाटमारीचा गुन्‍हा दाखल झालेला आहे.