आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पोचालकाला रात्रभर फिरवून लांबवला 14 लाखांचा माल, तिघांची टाेळी जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तालुक्यातील निंबळक शिवारात टेम्पोचालकाला अडवून अॅल्युमिनिअमच्या पट्ट्यांसह रोकड लांबवणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केली. शुक्रवारी दुपारी ही कामगिरी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी या टाेळीने १४ लाखांचा माल लुटला होता. चोरलेल्या मुद्देमालासह त्यांच्याकडे दोन मोटारी मिळाल्या. 
 
ऑगस्टच्या रात्री निंबळक शिवारात विनाक्रमांकाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांनी टेम्पोचालकाला अडवले. त्याला मारहाण करुन बळजबरीने मारुती झेन कारमध्ये बसवले. रात्रभर त्याला कारमधून फिरवत श्रीगोंदे तालुक्यातील निर्जन ठिकाणी सोडले. त्याच्याजवळील रोकडही हिसकावून घेतली. टेम्पोतील १४ लाख १८ हजार ८२१ रुपयांच्या अॅल्युमिनिअमच्या पट्ट्या लंपास करुन टेम्पोही बेवारस अवस्थेत सोडून दिला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. 
 
गुन्ह्यातील आरोपी बाबुर्डी घुमट शिवारात येणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, फौजदार श्रीधर गुठ्ठे, राजकुमार हिंगोले, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, योगेश गोसावी, दत्तात्रय जपे, पोलिस नाईक मल्लिकार्जुन बनकर, संदीप पवार, रोहित मिसाळ, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, संदीप घोडके, विजय वेठेकर, विजय ठोंबरे, चालक संभाजी कोतकर यांनी बाबुर्डी शिवारात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याचे नाव सचिन मुरलीधर भगत (वय २८) याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावेही सांगितली. पोलिसांनी महेश भानुदास थोरे (वय २२) भहिरु लक्ष्मण मोरे (वय २२, तिघेही रा. बाबुर्डी घुमट) यांनाही पकडले. इतर आरोपी मात्र फरार आहेत. पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी विनाक्रमांकाची टाटा झेस्ट, मारुती झेन, अॅल्युमिनिअमच्या पट्ट्या असा १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. 
बातम्या आणखी आहेत...