आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: विजेचा धक्का बसल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - लिंपणगाव शिवारातील शेंडेवाडी येथील दोन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. रामदास लक्ष्मण माने (वय ४८) शांताराम किसन माने (वय ३१) हे चुलते-पुतणे होते. हे दोघे रविवारी सायंकाळी उसाच्या पिकावर तणनाशक फवारण्यासाठी गेले होते. विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. त्या तारा लक्षात आल्याने शांताराम आधी तारेला चिकटला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या रामदास यांना जोराचा झटका बसला. दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. 
 
दुसरी घटना सोमवारी दुपारी घोडेगाव शिवारात घडली. हिरडगाव घोडेगावचे बाह्यस्रोत लाइनमन राजेंद्र सोनबा निकम (वय ३८) हे वीज दुरुस्तीचे काम करत होते. वीजतारांमधून अचानक पुरवठा सुरू झाल्याने त्यांना जोराचा झटका बसला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...