आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीच्या डिझेलसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चोरलेले डिझेल काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोसह तीन आरोपींना भिंगार पोलिसांनी पकडले. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील सहायक अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 
 
अक्षय विठ्ठल जाधव (वय १९), शुभम संतोष घोगरे (वय १९, दोघेही कोल्हेवाडी, सारोळा बद्दी, ता. नगर) हे दोघे महिंद्रा पिकअपमधून १५ हजार ८० रुपयांचे चोरीचे डिझेल घेऊन जात होते. हे डिझेल त्यांनी कंजारवाड्यातील शेख मोहंमद अहमद (३९) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांनाही अटक केली. 
 
सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्यासह फौजदार गजानन करेवाड, जंबे, द्वारके आडसूळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनंतर सापळा रचून ही कामगिरी करण्यात आली. यामध्ये महसूलच्या पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक जी. आर. गवळी यांनीही भाग घेतला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...