आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत फेब्रुवारीपासून रोज 3 ते 10 विमाने घेणार उड्डाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - येत्या 20 फेब्रुवारीदरम्यान शिर्डीच्या विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले. विमानतळावरून 180 आसनक्षमतेची रोज 3 ते 10 विमाने उड्डाण करू शकणार आहेत. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. शिर्डी येत्या दोन महिन्यांत देशाच्या हवाई नकाशावर येणार असल्याचे या वेळी स्पष्ट झाले.
अडीच कि.मी.चा रनवे, दोन टॅक्सी वे, पाच विमाने एकाच वेळी थांबू शकतील असे भव्य अँप्रन आदी कामे पूर्ण झाली असून पहिल्या टप्प्यात रोज 3 ते 10 विमाने ये-जा करू शकतील. सध्या फक्त दिवसा उड्डाणे शक्य आहेत. ऑक्टोबर 2014 नंतर दिवसा व रात्रीही विमाने उड्डाण करू शकणार आहेत.