आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेला ३२ कोटी नफा, अध्यक्ष गायकर यांची वार्षिक सभेत माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात ३२ कोटी नफा झाला. सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा ठराव सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. अजेंड्यावरील सहा विषयांसह ऐनवेळी आलेल्या विषयांनाही यावेळी मंजुरी देण्यात आली.
बँकेची वार्षिक सभा राष्ट्रीय पाठशाळेत बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष रामदास वाघ, आमदार वैभव पिचड, शिवाजी कर्डिले, संचालक जयंत ससाणे, जगन्नाथ राळेभात, अंबादास पिसाळ, दत्तात्रेय पानसरे, अण्णासाहेब म्हस्के, पांडुरंग अभंग, अरुण तनपुरे, बाजीराव खेमनर, रावसाहेब शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

बँकेच्या जिल्ह्यात हजार ११२ सहकारी संस्था ९०८ वैयक्तिक सभासद आहेत. ६९८ कोटींचे स्वभांडवल हजार १२१ कोटी ६६ लाखांच्या ठेवी आहेत. गुंतवणूक हजार ३०१ कोटी आहे. हजार ४७ कोटींचे कर्जवाटप वर्षभरात करण्यात आले. बँकेला ३२ कोटी ३९ लाखांचा नफा झाला आहे.
मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. बँकेच्या कामकाजाचा वार्षिक, अहवाल, ताळेबंद, नफा-तोटापत्रक आदी हिशेब, नफावाटणी २०१६-२०१७ अंदाजपत्रकाच्या मंजुरीचा विषय गायकर यांनी मांडला. त्याला पिसाळ यांनी मंजुरी दिली.

वैधानिक तपासणी अहवाल दुरुस्तीचा विषय मांडल्यानंतर जगन्नाथ राळेभात यांनी अनुमोदन दिले. वैधानिक लेखा परीक्षकाची नियुक्ती करण्याचा विषय पानसरे यांनी मांडला. त्याला उदय शेळके यांनी अनुमोदन दिले. रावसाहेब शेळके यांनी हिशेब तपासणीस नेमण्याचा विषय मांडला. त्याला अरुण तनपुरे यांनी अनुमोदन दिले. संचालक मंडळाने सूचवलेल्या पोटनियम दुरुस्तीचा विचार करून मंजुरी देण्याचा विषय पिसाळ यांनी मांडला. त्याला पानसरे यांनी अनुमोदन दिले.
ऐनवेळचे विषय पांडुरंग अभंग यांनी मांडले. त्यात सभासद सोसायट्यांना १० टक्के लाभांश देणे, विविध कार्यकारी सोसायट्यांना व्याजात सवलत देणे, शंभर टक्के वसुली करून देणाऱ्या सोसायट्यांना बक्षीस देणे, इमारत दुरुस्ती खर्चाला मंजुरी देणे आदी विषय होते. या विषयांना रावसाहेब शेळके यांनी अनुमोदन दिले. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोमवारी झालेल्या वार्षिक सभेत अध्यक्ष सीताराम गायकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. छाया : मंदार साबळे.

पालकमंत्र्यांचा फोटो छापावा
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सभासदाला सेवेत घ्यावे, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना कुटुंबातील इतर कोणताही सदस्य दुसऱ्या अन्य नोकरी नसेल तरच सेवेत घ्यावे, अशी मागणी जे. पी. वांढेकर यांनी केली. पुढील सभेच्यावेळी पुस्तिकेवर पालकमंत्र्यांचाही फोटो छापावा, अशी मागणीही करण्यात आली. त्याला आमदार कर्डिले यांनी सहमती दर्शवली.

थकबाकीदारांना जाब विचारा
अध्यक्षांनी त्यांचा तालुका थकबाकीमुक्त केला, पण इतर तालुक्यांचे काय? ज्यांच्याकडे थकबाकी असेल, त्यांना जाब विचारायला हवा, असे सांगत बँकेच्या शाखांना सुरक्षारक्षक नेमण्यात यावा, अशी मागणी एका ज्येष्ठ सभासदाने केली. तात्याबा बोऱ्हाडे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून व्याज माफ करावे, अशी सूचना मांडली.
बातम्या आणखी आहेत...