आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar 35 Old Women Going To Delhi For PM Narendra Modi's Meet News In Marathi

मोदी भेटीसाठी ३५ आजीबाई आज विमानाने दिल्लीकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरमधील ३५ आजीबाई चक्क विमानात बसून नवी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन देशातील वाढता भ्रष्टाचार महिलांवरील अत्याचाराच्या विषयांवर चर्चा करणार आहेत. पुण्याहून सोमवारी हे मंडळ रवाना होणार आहे.
स्टेशन रस्ता परिसरात आगरकर मळा, गाडळकर मळा भागातील या महिला आहेत. एकूण ४१ जणींपैकी ३५ जणी प्रथमच विमानात बसणार आहेत. त्यांचं हे स्वप्न संध्यावेल ग्रुपच्या निर्मला भंडारी पूर्ण करणार आहेत. या दिल्लीवारीसाठी खासदार दिलीप गांधी, त्यांच्या पत्नी सरोज माजी उपमहापौर गीतांजली काळे यांचे सहकार्य लाभले आहे.
यातील महिला गरीब, मध्यमवर्गीय आहेत. सुभद्रा गाडळकर (७०) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. लीलाबाई त्र्यंबक आवंडे या पापड, कुरडया करून घर चालवतात. अपंग नातवावर उपचारांसाठी त्या पैसे जमवत आहेत. माझं आयुष्य कष्टात गेलं. विमान केवळ आकाशात पाहिलं, प्रत्यक्षात विमानात बसता येईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असे लीलाबाई म्हणतात.
विमानवारीचा आनंद सर्वच महिलांना आहे. रुक्मिणी पडोळे (७१) या सर्वांत वृद्ध आहेत. पैकी अनेकजण स्वखर्चाने प्रवास करणार आहेत. संध्यावेलच्या निर्मला भंडारी, उषा जाधव, वत्सला भोंडे, सुमन खरटमल, रोहिणी फुलसौंदर यांच्या प्रयत्नांमुळे या आजीबाईंचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सोमवारी सकाळी या महिला आगरकर मळ्यातील विरंगुळा मैदानातून एसटीने पुण्याकडे निघतील. सायंकाळी पावणेपाचला त्या दिल्लीला निघतील. २३ ते २८ मार्च या काळात त्या आग्रा, मथुरा, वृंदावन, हरिद्वार येथेही भेटी देतील. दिल्लीत राष्ट्रपती पंतप्रधानांची भेट त्या घेणार आहेत. भ्रष्टाचारावर ठोस पावले उचलावीत महिला अत्याचारावर कडक कायदे करण्याची मागणी त्या करतील.
- निर्मला भंडारी, संस्थापक, संध्यावेल आजी ग्रुप